advertisement

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! मुंबईहून धावणाऱ्या या महत्त्वाच्या गाड्यांच्या वेळात बदल, प्रवासाआधी पाहा मध्य रेल्वेचं नवं वेळापत्रक

Last Updated:

मुंबईहून लातूर, नागपूर, अमरावती आणि सोलापूरकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वेने महत्त्वाची सूचना जारी केली आहे. मध्य रेल्वेने आपल्या अनेक मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात मोठे बदल केले आहेत

गाड्यांच्या वेळात बदल (फाईल फोटो)
गाड्यांच्या वेळात बदल (फाईल फोटो)
मुंबई : मुंबईहून लातूर, नागपूर, अमरावती आणि सोलापूरकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वेने महत्त्वाची सूचना जारी केली आहे. मध्य रेल्वेने आपल्या अनेक मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात मोठे बदल केले असून, काही गाड्यांचे टर्मिनल्सही बदलले आहेत. हे नवीन वेळापत्रक १३ आणि १४ एप्रिलपासून टप्प्याटप्प्याने लागू होणार आहे.
प्रमुख गाड्यांच्या वेळांमधील बदल खालीलप्रमाणे:
नागपूर दुरांतो एक्स्प्रेस (१२२८९): ही गाडी आता सीएसएमटीहून रात्री १९:५५ ऐवजी २०:३५ वाजता सुटेल. तर परतीच्या प्रवासात (१२२९०) ही गाडी सीएसएमटीला सकाळी ०८:०५ ऐवजी ०७:५० वाजता पोहोचेल.
अमरावती एक्स्प्रेस (१२१११): ही गाडी आता रात्री २०:०५ ऐवजी २०:५० वाजता सीएसएमटीवरून प्रस्थान करेल.
महानगरी एक्स्प्रेस (२२१७७): सीएसएमटीहून सुटण्याची वेळ आता ००:१५ असेल (पूर्वी ००:१०) आणि ती वाराणसीला पहाटे ०३:४५ वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात (२२१७८) ही गाडी वाराणसीहून सकाळी ०९:४५ वाजता निघेल.
advertisement
बेंगळुरू एक्स्प्रेस (११३०१): सीएसएमटीहून सुटण्याची वेळ आता सकाळी ०७:५५ असेल (पूर्वी ०८:१०).
हुबळी एक्स्प्रेस (१७३१८): दादरहून ही गाडी आता रात्री २०:०५ वाजता सुटेल (पूर्वी २०:१५).
लातूर-सीएसएमटी एक्स्प्रेस (२२१०८): ही गाडी आता सकाळी ७:५५ ऐवजी ८:०० वाजता सीएसएमटीला पोहोचेल.
सोलापूर-सीएसएमटी एक्स्प्रेस (१२११६): ही गाडी सकाळी ६:३५ ऐवजी ०६:३० वाजता मुंबईत दाखल होईल.
advertisement
कधीपासून होणार अंमलबजावणी?
१४ एप्रिलपासून दुरांतो आणि विदर्भ एक्स्प्रेसला हे बदल लागू होतील, तर १५ एप्रिलपासून गरीब रथ आणि पुणे-नागपूर एक्स्प्रेस नवीन वेळेनुसार धावतील. या बदलाचा परिणाम मुंबई, ठाणे, कल्याण, इगतपुरी, सोलापूर आणि बिदर यांसारख्या महत्त्वाच्या स्थानकांवरही होणार आहे.
रेल्वेने वेळेत केलेल्या या बदलांमुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी प्रवासापूर्वी अधिकृत रेल्वे ॲप किंवा चौकशी खिडकीवरून वेळेची खात्री करून घ्यावी, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! मुंबईहून धावणाऱ्या या महत्त्वाच्या गाड्यांच्या वेळात बदल, प्रवासाआधी पाहा मध्य रेल्वेचं नवं वेळापत्रक
Next Article
advertisement
करोडो लोकांना Income टॅक्स नोटीस, करदात्यांच्या मनात धडकी; 'NUDGE' Notice आली तर काय करावे, काय टाळावे
करोडो लोकांना Income टॅक्स नोटीस, करदात्यांच्या मनात धडकी; काय करावे, काय टाळावे
  • आयकर विभागाची NUDGE नोटीस

  • दुर्लक्ष केलं तर अडचण वाढणार

  • काय करावे, काय टाळावे?

View All
advertisement