Krantijyoti Vidyalay OTT Release : थिएटरनंतर 'क्रांतिज्योती'ची पोरं OTT गाजवणार! रिलीज डेट समोर
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Krantijyoti Vidyalay OTT Release : थिएटर गाजवल्यानंतर क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम हा सिनेमा ओटीटीवर रिलीज होण्याची सज्ज झाला आहे. सिनेमा OTT रिलीज डेट नुकतीच समोर आली आहे.
या वर्षाच्या सुरुवातीला 'क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम' हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि चित्रपटानं पहिल्याच दिवशी प्रेक्षकांची मनं जिंकली, हा चित्रपट जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी सज्ज झाला आहे. थिएटर गाजवल्यानंतर क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम हा सिनेमा ओटीटीवर रिलीज होण्याची सज्ज झाला आहे.
advertisement
मराठी माध्यमातून शिक्षण घेण्याचा आनंद, जिद्द, शाश्वतता आणि सांस्कृतिक अभिमान यांचा गौरव या चित्रपटाच्या माध्यमातून करण्यात आला आहे. समकालीन आव्हानांना सामोरे जाताना आपली मुळे आणि ओळख जपणाऱ्या एका मराठी शाळेचा आणि या शाळेशी संबंधित माणसांचा भावनिक प्रवास या चित्रपटात प्रभावीपणे मांडण्यात आला आहे.
advertisement
advertisement
सचिन खेडेकर, अमेय वाघ, प्राजक्ता कोळी, क्षिती जोग, सिद्धार्थ चांदेकर, हरीश दुधाडे, पुष्कराज चिरपुटकर आणि कादंबरी कदम असे उत्तम कलाकार या चित्रपटात आहेत. सशक्त कथानक, प्रभावी अभिनय आणि मराठी माध्यम शिक्षणसंस्थांना दिलेली भावनिक मानवंदना यामुळे क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम हा चित्रपट पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनात घर करण्यास सज्ज झाला आहे.
advertisement
निर्माती आणि अभिनेत्री क्षिती जोग म्हणाली "क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम या चित्रपटाची निर्मिती एका खोल भावनिक जाणीवेतून झाली आहे. मातृभाषेतील शिक्षण हे केवळ भाषेपुरते मर्यादित नसून ओळख, आत्मविश्वास आणि सांस्कृतिक सातत्याशी जोडलेले आहे, हा त्याचा गाभा आहे. आता हा चित्रपट चित्रपटगृहांतून मराठी ZEE5सारख्या जागतिक व्यासपीठावर पोहोचताना पाहणे अत्यंत खास आहे.
advertisement
दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी पुढे सांगितले, "हा चित्रपट मराठी माध्यम शाळांचा आणि त्यांच्याशी जोडलेल्या भावनिक विश्वाचा उत्सव आहे. अभिमान, आपलेपणा आणि आपला भाषिक व सांस्कृतिक वारसा जपण्याचे महत्त्व या चित्रपटातून मांडण्यात आले आहे. चित्रपटगृहांत प्रेक्षकांकडून मिळालेले प्रेम भारावून टाकणारे होते. आता मराठी ZEE5च्या माध्यमातून असंख्य घरांपर्यंत आणि मनांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळत आहे."
advertisement
अभिनेता सचिन खेडेकर म्हणाले, "क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम हा केवळ एक चित्रपट नाही, तर तो आपल्या सामूहिक स्मृतींचे प्रतिबिंब आहे. आपल्यापैकी अनेकांनी मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये शिक्षण घेतले असून, त्या शाळांनी आपली मूल्ये आणि व्यक्तिमत्त्व घडवले आहे. त्या परंपरेचा सन्मान करणाऱ्या या कथेत सहभागी होता आले, याचा मला मनापासून आनंद आहे."
advertisement
क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम या सिनेमानं थिएटरमध्ये जवळपास 25 कोटींची कमाई केली आहे. थिएटरमध्ये सिनेमाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. अनेक ठिकाणी दिवसातील सगळे शो हे क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम या सिनेमाचे होते. ज्यांना थिएटरमध्ये जाऊन हा सिनेमा पाहता आला नाही त्यांना आता मराठी ZEE 5 या ओटीटीवर हा सिनेमा पाहायला मिळेल. क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम हा सिनेमा 27 फेब्रुवारी 2026 पासून मराठी ZEE5 वर पाहता येणार आहे.









