advertisement

T20 world cup 2026 : टीमची साथ सोडताना आवाज कातरला, कंठ दाटून आला, भर प्रेस कॉन्फरेन्समध्ये ढसाढसा रडला हेड कोच!

Last Updated:

Afghanistan Head Coach Jonathan Trott in tears : मुख्य प्रशिक्षकपद सोडण्याचा निर्णय माझा नव्हता, म्हणून मी तेवढ्यावरच सोडतो. कदाचित वेळ योग्य असेल, कदाचित नसेलही. मला माहित नाही, पण मी माझ्या मुलांना भविष्यासाठी शुभेच्छा देतो, असं जोनाथन ट्रॉट म्हणाले.

Jonathan Trott in tears during his final Press Conference as Afghanistan
Jonathan Trott in tears during his final Press Conference as Afghanistan
Jonathan Trott in tears during his final Press Conference : अफगाणिस्तान क्रिकेट टीमचा टी20 वर्ल्ड कप 2026 मधील प्रवास आता संपला असून, टीमने आपल्या शेवटच्या मॅचमध्ये कॅनडावर 82 रन्सनी विजय मिळवला. या सीझनमध्ये खेळलेल्या 4 मॅचेसपैकी 2 मॅचेसमध्ये विजय मिळवूनही अफगाणिस्तानला सुपर-8 मध्ये स्थान मिळवता आले नाही. कॅनडाविरुद्धची ही मॅच संपल्यानंतर टीमचे हेड कोच जोनाथन ट्रॉट यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे, जो अफगाण क्रिकेटसाठी एक मोठा धक्का मानला जात आहे.

शेवटच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये ट्रॉट भावुक

जोनाथन ट्रॉट यांचा अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डासोबतचा करार या वर्ल्ड कपनंतर संपणार असल्याचे आधीच स्पष्ट झाले होते. बोर्डाने ट्रॉट यांचा कार्यकाळ न वाढवण्याचा निर्णय घेतल्याने अफगाण क्रिकेटमध्ये आता एका नवीन अध्यायाची सुरुवात होणार आहे. आपल्या शेवटच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये ट्रॉट भावुक झाले होते. मुख्य प्रशिक्षकपद सोडण्याचा निर्णय माझा नव्हता, म्हणून मी तेवढ्यावरच सोडतो. कदाचित वेळ योग्य असेल, कदाचित नसेलही. मला माहित नाही, पण मी माझ्या मुलांना भविष्यासाठी शुभेच्छा देतो, असं जोनाथन ट्रॉट म्हणाले.
advertisement

राशीद खानने मानले आभार

ट्रॉट यांच्या मार्गदर्शनाखाली अफगाणिस्तान टीमने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठी झेप घेतली होती, त्यामुळे त्यांच्या जाण्याने खेळाडू भावूक झाले आहेत. कॅप्टन राशिद खान याने मॅच संपल्यानंतर ट्रॉट यांचे आभार मानले आणि त्यांच्या योगदानाचे कौतुक केले. ट्रॉट यांचे टीमपासून वेगळे होणे हे संपूर्ण अफगाण क्रिकेटसाठी क्लेशदायक असल्याचे राशिदने म्हटले आहे. ट्रॉट यांच्या कार्यकाळात टीमने अनेक बलाढ्य संघांना चकित केले होते.
advertisement
advertisement

'प्लेयर ऑफ द मॅच' अवॉर्ड

दरम्यान, कॅनडाविरुद्धच्या मॅचमध्ये 95 रन्सची तुफानी बॅटिंग करणाऱ्या इब्राहिम जादरानने आपला 'प्लेयर ऑफ द मॅच' अवॉर्ड जोनाथन ट्रॉट यांना समर्पित केला. आपल्या लाडक्या कोचला मिळालेली ही ही एक मोठी मानवंदना होती. प्रेस कॉन्फरन्स दरम्यान ट्रॉट यांच्या डोळ्यांतही पाणी उभे राहिले होते. खेळाडू आणि कोच यांच्यातील हे घट्ट नाते अफगाणिस्तानच्या क्रिकेट मैदानावरील कामगिरीत स्पष्टपणे दिसून येत होते.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
T20 world cup 2026 : टीमची साथ सोडताना आवाज कातरला, कंठ दाटून आला, भर प्रेस कॉन्फरेन्समध्ये ढसाढसा रडला हेड कोच!
Next Article
advertisement
करोडो लोकांना Income टॅक्स नोटीस, करदात्यांच्या मनात धडकी; 'NUDGE' Notice आली तर काय करावे, काय टाळावे
करोडो लोकांना Income टॅक्स नोटीस, करदात्यांच्या मनात धडकी; काय करावे, काय टाळावे
  • आयकर विभागाची NUDGE नोटीस

  • दुर्लक्ष केलं तर अडचण वाढणार

  • काय करावे, काय टाळावे?

View All
advertisement