advertisement

पुणेकरांची घरखरेदीकडे पाठ; घरांच्या विक्रीत मोठी घट, आता शहरात आली ही नवी क्रेझ, मार्केटमध्ये काय घडतंय?

Last Updated:

जानेवारी महिन्यात पुणे जिल्ह्यात घरखरेदीच्या व्यवहारांत तब्बल १७ टक्क्यांची घट नोंदवण्यात आली आहे.

पुणेकरांची घरखरेदीकडे पाठ (AI Image)
पुणेकरांची घरखरेदीकडे पाठ (AI Image)
पुणे : पुण्याच्या रिअल इस्टेट मार्केटसाठी नवीन वर्षाची सुरुवात काहीशी निराशाजनक झाली आहे. गेल्या वर्षी घरांच्या विक्रीत झालेली घसरण २०२६ मध्येही कायम असल्याचे चित्र आहे. 'नाइट फ्रँक इंडिया'च्या ताज्या अहवालानुसार, जानेवारी महिन्यात पुणे जिल्ह्यात घरखरेदीच्या व्यवहारांत तब्बल १७ टक्क्यांची घट नोंदवण्यात आली आहे.
आकडेवारी काय सांगते?
अहवालानुसार, जानेवारी २०२६ मध्ये पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यात एकूण १४ हजार २५७ घरांचे व्यवहार झाले. गेल्या वर्षी (जानेवारी २०२५) हाच आकडा १७ हजार ४४९ इतका होता. घरांची विक्री घटल्याने मुद्रांक शुल्क संकलनातही ५ टक्क्यांची घट झाली असून, सरकारी तिजोरीत ६०९ कोटी रुपये जमा झाले आहेत.
परवडणारी घरे घटली, मोठ्या घरांची मागणी वाढली
पुण्यातील घरांच्या विक्रीचा कल आता बदलताना दिसत आहे. सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणाऱ्या घरांचे प्रमाण कमी होत असून, नागरिक मोठ्या आणि महागड्या घरांना पसंती देत आहेत.
advertisement
२५ लाखांपर्यंतची घरे: यांचा वाटा ३२ टक्क्यांवरून थेट २५ टक्क्यांवर घसरला आहे.
५० लाख ते १ कोटींची घरे: या श्रेणीतील घरांची मागणी ४ टक्क्यांनी वाढून २९ टक्क्यांवर पोहोचली आहे.
आलिशान घरे (१ ते २.५ कोटी): या घरांचे प्रमाण आता १४ टक्के झाले आहे.
कोणत्या भागात सर्वाधिक विक्री?
पुणे शहराच्या मध्य भागात (हवेली, पुणे महापालिका आणि पिंपरी-चिंचवड) सर्वाधिक ६७ टक्के व्यवहार झाले आहेत. त्याखालोखाल पश्चिम पुण्यात (मावळ, मुळशी) १६ टक्के विक्री झाली. उत्तर, दक्षिण आणि पूर्व पुण्यात तुलनेने कमी व्यवहार झाले आहेत.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
पुणेकरांची घरखरेदीकडे पाठ; घरांच्या विक्रीत मोठी घट, आता शहरात आली ही नवी क्रेझ, मार्केटमध्ये काय घडतंय?
Next Article
advertisement
करोडो लोकांना Income टॅक्स नोटीस, करदात्यांच्या मनात धडकी; 'NUDGE' Notice आली तर काय करावे, काय टाळावे
करोडो लोकांना Income टॅक्स नोटीस, करदात्यांच्या मनात धडकी; काय करावे, काय टाळावे
  • आयकर विभागाची NUDGE नोटीस

  • दुर्लक्ष केलं तर अडचण वाढणार

  • काय करावे, काय टाळावे?

View All
advertisement