advertisement

Raj Thackeray: शिंदेंसोबतच्या भेटीवर राज यांनी मौन सोडलं, ‘’काल त्यांना भेटलो, उद्या मुख्यमंत्र्यांना....’’

Last Updated:

Raj Thackeray On meeting With Eknath Shinde: राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात नुकतीच एक महत्त्वाची बैठक पार पडली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. या भेटीवर राज ठाकरे यांनी मौन सोडले.

शिंदेंसोबतच्या भेटीवर राज यांनी मौन सोडलं, ‘’काल त्यांना भेटलो, उद्या मुख्यमंत्र्यांना....’’
शिंदेंसोबतच्या भेटीवर राज यांनी मौन सोडलं, ‘’काल त्यांना भेटलो, उद्या मुख्यमंत्र्यांना....’’
मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात नुकतीच एक महत्त्वाची बैठक पार पडली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. या भेटीवर राज ठाकरे यांनी मौन सोडले. आज मुंबईत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर राज ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. राज ठाकरे हे उद्धव यांची साथ सोडणार का, यावरही तर्क लढवले जात होते. मात्र, राज ठाकरे यांनी आपली भेट मुंबई आणि शहरातील प्रश्नांच्या अनुषंगाने भेट घेतली असल्याचे स्पष्ट केले. काल आपण एकनाथ शिंदे यांना भेटलो, उद्या मुख्यमंत्र्यांनाही भेटू असेही त्यांनी म्हटले.
advertisement
राज ठाकरे यांनी म्हटले की, एकनाथ शिंदे यांच्यासोबतची भेट ही राजकीय नव्हती. आता निवडणुका संपल्या आहेत. ते सत्तेत आहेत. आम्हाला जर काही सांगायचे असेल, काही चांगल्या गोष्टी करुन घ्यायच्या असतील, तर भेट घेतलीच पाहिजे. प्रत्येक गोष्टीत राजकारण आणायची गरज नसल्याचेही राज यांनी नमूद केले.
आपल्याकडे चांगले रस्ते, फ्लायओव्हर्स व्हावेत चांगली गोष्ट आहे. मात्र आपण मूळ गोष्टाली हात घालत नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणावर डेव्हलपमेंट होते आहे. मात्र, ही एक सूज आहे. त्याचा लोकांना किती त्रास होतोय, मलाही होतोय. लोकांकडे एकापेक्षा जास्त कार असातत. अनेक इमारतींमध्ये पार्किंगचा मोठा मुद्दा आहे. मागे हीच गोष्ट मी मुख्यमंत्र्यांना भेटून सांगितली होती. एकनाथ शिंदेंनी लगेच भूषण गगराणींना फोनकरून सांगितल्याचे राज यांनी सांगितले. लोकांच्या प्रश्नासाठी आपण काल एकनाथ शिंदे यांना भेटलो, उद्या मुख्यमंत्र्यांना देखील भेटू असेही त्यांनी सांगितले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Raj Thackeray: शिंदेंसोबतच्या भेटीवर राज यांनी मौन सोडलं, ‘’काल त्यांना भेटलो, उद्या मुख्यमंत्र्यांना....’’
Next Article
advertisement
करोडो लोकांना Income टॅक्स नोटीस, करदात्यांच्या मनात धडकी; 'NUDGE' Notice आली तर काय करावे, काय टाळावे
करोडो लोकांना Income टॅक्स नोटीस, करदात्यांच्या मनात धडकी; काय करावे, काय टाळावे
  • आयकर विभागाची NUDGE नोटीस

  • दुर्लक्ष केलं तर अडचण वाढणार

  • काय करावे, काय टाळावे?

View All
advertisement