advertisement

Income Tax रिफंडच्या प्रतीक्षेत आहात? एका चुकीच्या क्लिकमुळे बँक खातं होऊ शकतं रिकामं; प्राप्तिकर विभागाचा इशारा

Last Updated:
सध्या टॅक्स रिफंडमध्ये होणाऱ्या विलंबाचा फायदा घेत सायबर गुन्हेगार सामान्य करदात्यांना लक्ष्य करत आहेत. चला तर मग, या 'रिफंड स्कॅम'पासून कसं वाचायचं, हे जाणून घेऊया.
1/8
आर्थिक वर्ष संपलं की आपली लगबग सुरू होते ती 'आयटीआर' (ITR) फाईल करण्याची. टॅक्स भरून झाला की, त्यानंतर आपल्याला वेध लागतात ते आपल्या हक्काच्या 'रिफंड'चे.
आर्थिक वर्ष संपलं की आपली लगबग सुरू होते ती 'आयटीआर' (ITR) फाईल करण्याची. टॅक्स भरून झाला की, त्यानंतर आपल्याला वेध लागतात ते आपल्या हक्काच्या 'रिफंड'चे. "कधी येईल पैसे?" या विचारात आपण वारंवार आपलं बँक खातं तपासत असतो. पण, हीच प्रतीक्षा सध्या सायबर चोरांसाठी मोठी संधी ठरत आहे.
advertisement
2/8
तुम्ही रिफंडची वाट पाहत असतानाच अचानक मोबाईलवर मेसेज येतो
तुम्ही रिफंडची वाट पाहत असतानाच अचानक मोबाईलवर मेसेज येतो "तुमचा टॅक्स रिफंड थांबवण्यात आला आहे, त्वरित खालील लिंकवर क्लिक करून माहिती अपडेट करा, अन्यथा दंड लागेल." घाबरून किंवा घाईत आपण त्या लिंकवर क्लिक करतो आणि तिथेच मोठी फसवणूक होते. सध्या टॅक्स रिफंडमध्ये होणाऱ्या विलंबाचा फायदा घेत सायबर गुन्हेगार सामान्य करदात्यांना लक्ष्य करत आहेत. चला तर मग, या 'रिफंड स्कॅम'पासून कसं वाचायचं, हे जाणून घेऊया.
advertisement
3/8
1. रिफंड मिळायला उशीर का होतो?अनेक करदात्यांच्या मनात प्रश्न असतो की आयटीआर भरूनही रिफंड का येत नाहीये? प्राप्तिकर विभागाने स्पष्ट केलं आहे की:
डेटा मॅचिंग: तुमच्या दाव्यांची आणि विभागाकडील माहितीची पूर्ण पडताळणी झाल्यावरच रिफंड जारी होतो.
अतिरिक्त तपासणी: जर माहितीत थोडाही फरक आढळला, तर प्रक्रिया लांबणीवर पडते.
बँक व्हॅलिडेशन: तुमचं बँक खातं प्री-व्हॅलिडेट नसेल तरीही अडथळा येऊ शकतो.
1. रिफंड मिळायला उशीर का होतो?अनेक करदात्यांच्या मनात प्रश्न असतो की आयटीआर भरूनही रिफंड का येत नाहीये? प्राप्तिकर विभागाने स्पष्ट केलं आहे की:डेटा मॅचिंग: तुमच्या दाव्यांची आणि विभागाकडील माहितीची पूर्ण पडताळणी झाल्यावरच रिफंड जारी होतो.अतिरिक्त तपासणी: जर माहितीत थोडाही फरक आढळला, तर प्रक्रिया लांबणीवर पडते.बँक व्हॅलिडेशन: तुमचं बँक खातं प्री-व्हॅलिडेट नसेल तरीही अडथळा येऊ शकतो.
advertisement
4/8
हीच अनिश्चितता सायबर ठगांचे हत्यार बनत आहे. नुकत्याच समोर आलेल्या एका घटनेत, एका करदात्याने अशाच बनावट लिंकवर क्लिक करून आपली गोपनीय माहिती दिली आणि त्याला 1.5 लाख रुपयांचा फटका बसला.
हीच अनिश्चितता सायबर ठगांचे हत्यार बनत आहे. नुकत्याच समोर आलेल्या एका घटनेत, एका करदात्याने अशाच बनावट लिंकवर क्लिक करून आपली गोपनीय माहिती दिली आणि त्याला 1.5 लाख रुपयांचा फटका बसला.
advertisement
5/8
2. फसवणुकीची पद्धत (Modus Operandi)सायबर गुन्हेगार प्राप्तिकर विभागाशी मिळत्याजुळत्या नावाचे ईमेल किंवा एसएमएस पाठवतात. त्यात असा दावा केला जातो की तुमचा रिफंड प्रलंबित आहे. त्या मेसेजमध्ये एक लिंक असते, जी तुम्हाला हुबेहूब सरकारी वेबसाइटसारख्या दिसणाऱ्या बनावट पेजवर घेऊन जाते. तिथे तुमचा पॅन कार्ड नंबर, बँक डिटेल्स आणि ओटीपी विचारला जातो. तुम्ही ही माहिती भरली की तुमचं खातं साफ होतं.
2. फसवणुकीची पद्धत (Modus Operandi)सायबर गुन्हेगार प्राप्तिकर विभागाशी मिळत्याजुळत्या नावाचे ईमेल किंवा एसएमएस पाठवतात. त्यात असा दावा केला जातो की तुमचा रिफंड प्रलंबित आहे. त्या मेसेजमध्ये एक लिंक असते, जी तुम्हाला हुबेहूब सरकारी वेबसाइटसारख्या दिसणाऱ्या बनावट पेजवर घेऊन जाते. तिथे तुमचा पॅन कार्ड नंबर, बँक डिटेल्स आणि ओटीपी विचारला जातो. तुम्ही ही माहिती भरली की तुमचं खातं साफ होतं.
advertisement
6/8
3. प्राप्तिकर विभागाचा अधिकृत इशाराया वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर प्राप्तिकर विभागाने ताजी ॲडव्हायझरी जारी केली आहे. विभाग सांगतो की
3. प्राप्तिकर विभागाचा अधिकृत इशाराया वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर प्राप्तिकर विभागाने ताजी ॲडव्हायझरी जारी केली आहे. विभाग सांगतो की "प्राप्तिकर विभाग कधीही एसएमएस किंवा ईमेलद्वारे तुमची बँक खात्याची माहिती, पिन किंवा ओटीपी मागत नाही. तसेच, कोणत्याही वैयक्तिक नंबरवरून रिफंड प्रक्रियेसाठी लिंक पाठवली जात नाही."
advertisement
7/8
4. सुरक्षित राहण्यासाठी 'या' 5 नियमांचे पालन करातुमचा कष्टाचा पैसा सुरक्षित ठेवायचा असेल, तर या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा
अधिकृत पोर्टलचाच वापर: रिफंड स्टेटस पाहण्यासाठी फक्त incometax.gov.in या अधिकृत वेबसाइटचा वापर करा.
शंकास्पद लिंक टाळा: अनोळखी नंबरवरून आलेल्या कोणत्याही 'रिफंड लिंक'वर क्लिक करू नका.
गोपनीयता पाळा: आपला ओटीपी (OTP), पिन किंवा बँकिंग पासवर्ड कोणाशीही शेअर करू नका.
घाईत निर्णय नको: मेसेजमध्ये 'तात्काळ कारवाई करा' अशी धमकी असली तरी पॅनिट होऊ नका. विभाग कोणतीही नोटीस पाठवण्यापूर्वी अधिकृत ईमेल किंवा डॅशबोर्डवर माहिती देतो.
4. सुरक्षित राहण्यासाठी 'या' 5 नियमांचे पालन करा तुमचा कष्टाचा पैसा सुरक्षित ठेवायचा असेल, तर या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा अधिकृत पोर्टलचाच वापर: रिफंड स्टेटस पाहण्यासाठी फक्त incometax.gov.in या अधिकृत वेबसाइटचा वापर करा. शंकास्पद लिंक टाळा: अनोळखी नंबरवरून आलेल्या कोणत्याही 'रिफंड लिंक'वर क्लिक करू नका. गोपनीयता पाळा: आपला ओटीपी (OTP), पिन किंवा बँकिंग पासवर्ड कोणाशीही शेअर करू नका. घाईत निर्णय नको: मेसेजमध्ये 'तात्काळ कारवाई करा' अशी धमकी असली तरी पॅनिट होऊ नका. विभाग कोणतीही नोटीस पाठवण्यापूर्वी अधिकृत ईमेल किंवा डॅशबोर्डवर माहिती देतो.
advertisement
8/8
रिपोर्ट करा जर तुम्हाला असा मेसेज आला, तर त्याची तक्रार त्वरित सायबर पोलिसांकडे किंवा प्राप्तिकर विभागाच्या अधिकृत हँडलवर करा. ऑनलाइन जगतात 'सतर्कता' हाच सर्वात मोठा बचाव आहे. रिफंडला थोडा उशीर झाला तरी चालेल, पण घाईघाईत आपली माहिती चोरांच्या हाती लागू देऊ नका.
रिपोर्ट करा जर तुम्हाला असा मेसेज आला, तर त्याची तक्रार त्वरित सायबर पोलिसांकडे किंवा प्राप्तिकर विभागाच्या अधिकृत हँडलवर करा. ऑनलाइन जगतात 'सतर्कता' हाच सर्वात मोठा बचाव आहे. रिफंडला थोडा उशीर झाला तरी चालेल, पण घाईघाईत आपली माहिती चोरांच्या हाती लागू देऊ नका.
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement