वडिल सुपरस्टार, तरी मुलगा 200 फिल्म्समधून रिजेक्ट, 'विवाह' करताच लागली लॉटरी; आज 300 कोटींचा मालक
- Published by:Minal Gurav
Last Updated:
बॉलिवूडचा फेमस अभिनेता ज्याचे वडिलही सुपरस्टार होते. पण अभिनेत्याला इंडस्ट्रीत करिअर करण्यासाठी खूप पापड लाटावे लागले. आज हा अभिनेता 300 कोटींचा मालक आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
आपण बोलत आहोत तो अभिनेता म्हणजे शाहिद कपूर. वडिल पंकज कपूर बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते पण त्यांच्या मुलाला इंडस्ट्रीत येण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. शाहिदीने इश्क विश्कमधून डेब्यू केला. त्याला चॉकलेट बॉयचा टॅगही मिळाला. पण त्यानंतर चार वर्ष त्याच्याकडे काम नव्हतं. त्याला 200 फिल्म्समधून रिजेक्ट करण्यात आलं होतं. त्याने काही सिनेमात काम मिळवली पण ते सगळे फ्लॉप ठरले. त्यानंतर त्याने विवाह सिनेमात काम केलं आणि त्याचं करिअर रुळावर आलं.
advertisement
शाहिद कपूर 'इश्क विश्क' या त्याच्या पहिल्या चित्रपटातील चॉकलेट बॉय इमेजपासून ते 'कबीर सिंग' आणि 'फर्जी' सारख्या जबरदस्त भूमिकांपर्यंतचा त्याचा प्रवास खरोखरच उल्लेखनीय आहे. पण फार कमी लोकांना माहिती आहे की तो खूप आधी पडद्यावर दिसला होता. त्याने ऐश्वर्या रायच्या 'ताल' आणि 'दिल तो पागल है' मध्ये बँकग्राऊंड डान्सर म्हणून काम केलं होतं.
advertisement
advertisement








