advertisement

आजचं हवामान: छत्रीसोबतच घेऊन फिरा! 24 तासांत 5 जिल्ह्यांवर गारपिटीचं संकट, स्कायमेटकडून अलर्ट

Last Updated:
आता थंडीचे कपडे कपाटात ठेवून छत्री आणि पाण्याचे बाटली सोबत ठेवण्याची वेळ आली आहे. कारण फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्र पावसाचा शिडकावा आणि उन्हाचा चटका असं दुहेरी संकट ओढवणार आहे.
1/8
मागच्या 24 तासांत अगदी विचित्र स्थिती निर्माण झाली आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात गारपीट तर कोकणात दमट हवामान आणि उर्वरित महाराष्ट्रात कडाक्याचं ऊन. बापरे नको झालं इतकी अंगाची लाहीलाही होत आहे. फेब्रुवारी महिना संपत आला असताना सध्या महाराष्ट्रात हवामानाचा लपंडाव सुरू आहे.

2/8
अंगाची लाहीलाही करणारा उन्हाचा चटका आणि त्यातच मध्येच येणाऱ्या पावसाच्या सरींमुळे नागरिक हैराण झाले आहेत. १ जानेवारीपासून आतापर्यंत देशात पावसाचं प्रमाण ५९ टक्क्यांनी घटलं असून, डोंगरदऱ्यांमध्ये यंदा थंडी आणि बर्फवृष्टी दोन्ही कमी झाली आहे. पण मग आता हा पाऊस नक्की कुठून येतोय?

3/8
स्कायमेट हवामान तज्ज्ञ महेश पलावत यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या हवेच्या चक्राकार स्थितीमुळे ओडिसा आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर हालचाली वाढल्या आहेत. याचा प्रभाव विदर्भ आणि लगतच्या मराठवाड्यावर होत आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे बाष्पयुक्त वारे दक्षिण भारतामार्गे महाराष्ट्रात शिरत आहेत. यामुळे विशेषतः विदर्भ, मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात पावसाळी ढग तयार होत आहेत.

4/8
समुद्राकडून येणारे आर्द्र वारे आणि उत्तरेकडून येणारे उष्ण वारे एकत्र आल्यामुळे वातावरणात 'अस्थिरता' निर्माण झाली आहे. पुढचे २४ तास मराठवाड्यात पाऊस राहील. तर मार्चच्या पहिल्या आठवड्यात पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

5/8
स्कायमेटच्या अंदाजानुसार पुढच्या २४ ते ४८ तासांत विदर्भ आणि दक्षिण मराठवाड्याच्या काही भागात ढगाळ वातावरण असेल आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता आहे. विशेषतः नागपूर, गडचिरोली आणि लातूर-धाराशिवच्या पट्ट्यात पावसाच्या सरी हजेरी लावू शकतात.

6/8
मुंबईसह कोकण पट्ट्यात मात्र पावसाची शक्यता कमी आहे. इथे उष्णतेचा पारा वाढणार असून दमटपणामुळे उकाडा अधिक जाणवेल. पुणे, नाशिक आणि कोल्हापूर पट्ट्यात ऊन वाढणार आहे. दुपारी तापमान ३२ ते ३५ अंशांच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे.

7/8
हवामान तज्ज्ञांच्या मते, उत्तरेकडून येणारे थंड वारे  यंदा खूपच कमकुवत आहेत. त्यामुळे उत्तरेकडे होणारी बर्फवृष्टी कमी झाली असून तिथून आता गरम वारे महाराष्ट्राकडे येऊ लागले आहेत. याचाच अर्थ असा की, आता थंडीला पूर्णविराम मिळाला असून उन्हाळ्याची चाहूल तीव्र झाली आहे.

8/8
ऐन रब्बीची पिके काढणीला आली असताना या अवकाळी पावसामुळे पिकांच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची भीती आहे. विदर्भात काही ठिकाणी गारपिटीचा धोका नसला तरी, मेघगर्जना आणि पावसाच्या सरींमुळे पिकांचे नुकसान होऊ शकते.

बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement