advertisement

पुणे हादरलं! बारावीचा पेपर देऊन बाहेर येताच विद्यार्थ्यावर कोयत्यानं सपासप वार; अल्पवयीन मुलांचं कांड

Last Updated:

१८ वर्षीय विद्यार्थी मंगळवारी दुपारी बारावीचा पेपर देऊन महाविद्यालयाबाहेर पडला होता. तो घरी जाण्याच्या तयारीत असतानाच, दबा धरून बसलेल्या तीन अल्पवयीन मुलांनी त्याला गाठलं.

विद्यार्थ्यावर कोयत्यानं सपासप वार (AI Image)
विद्यार्थ्यावर कोयत्यानं सपासप वार (AI Image)
पुणे : पुण्यात कोयता गँगची दहशत कमी होण्याचं नाव घेत नाहीये. कोथरूडमधील एका नामांकित महाविद्यालयाच्या परिसरात मंगळवारी दुपारी बारावीची परीक्षा देऊन बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यावर तीन अल्पवयीन मुलांनी कोयत्याने वार केले. जुन्या वादातून हा हल्ला झाला असून, भरवस्तीत घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
नेमकी घटना काय?
जखमी झालेला १८ वर्षीय विद्यार्थी मंगळवारी दुपारी बारावीचा पेपर देऊन महाविद्यालयाबाहेर पडला होता. तो घरी जाण्याच्या तयारीत असतानाच, दबा धरून बसलेल्या तीन अल्पवयीन मुलांनी त्याला गाठलं. काही समजण्याच्या आतच त्यांनी शिवीगाळ करत धारदार कोयत्याने विद्यार्थ्यावर वार केले. या हल्ल्यात विद्यार्थी किरकोळ जखमी झाला असून, त्याला तातडीने उपचार देण्यात आले आहेत.
advertisement
दहावीतल्या वादाचा सूड!
पोलीस तपासात समोर आले की, जखमी विद्यार्थी आणि हल्लेखोर मुले हे पूर्वी वारजे भागातील एकाच शाळेत शिक्षण घेत होते. दहावीत असताना त्यांच्यात काही कारणावरून वाद झाला होता. त्याच वादाचा राग मनात धरून, आरोपींनी तो बारावीची परीक्षा कोणत्या केंद्रावर देतोय याची माहिती काढली आणि त्याला गाठून हा हल्ला केला.
advertisement
पोलिसांची तत्परता: तिघे ताब्यात
घटनेची माहिती मिळताच परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम आणि कोथरूड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी वेगाने हालचाली करत तिन्ही अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून हल्ल्यासाठी वापरलेला कोयता जप्त केला आहे.
भरदिवसा आणि महाविद्यालयीन परिसरात झालेल्या या हल्ल्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. कोथरूड पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
पुणे हादरलं! बारावीचा पेपर देऊन बाहेर येताच विद्यार्थ्यावर कोयत्यानं सपासप वार; अल्पवयीन मुलांचं कांड
Next Article
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement