advertisement

ENG Into Semis : न्यूझीलंड अन् श्रीलंकेच्या 2-2 मॅच शिल्लक तरीही इंग्लंड थेट सेमीफायनलमध्ये कशी? लॉजिक काय? कुणालाच कळलं नाही

Last Updated:

How england qualified for semifinals : पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर इंग्लंडचा संघ थेट सेमीफायनलमध्ये पोहोचला आहे. पण असं झालं तरी कसं? जाणून घ्या ग्रुप बीच्या पाईंट्स टेबलचं समीकरण

How england qualified for semifinals with 4 points
How england qualified for semifinals with 4 points
England into the Semis of T20 World Cup : सलग चार मॅच जिंकून इंग्लंडने आता टी-ट्वेंटी वर्ल्ड कप 2026 च्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. सुपर 8 मध्ये इंग्लंडने पाकिस्तानचा पराभव केला आहे. अखेरच्या ओव्हरपर्यंत चाललेल्या या सामन्यात इंग्लंडला घासून विजय खेचावा लागला. कॅप्टन हॅरी ब्रुक याने अफलातून कामगिरी करत शतक ठोकलं. तब्बल 200 च्या स्ट्राईक रेटने त्याने पाकिस्तानी बॉलर्सला धुतलं. अशातच आता इंग्लंडने सेमीफायनलचं तिकीट मिळवलं आहे. पण पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्या प्रत्येकी 2-2 शिल्लक असताना इंग्लंडला थेट सेमीफायनलला का पाठवलं? याच उत्तर तुम्हाला देखील कळालं नसेल. चला तर मग जाणून घ्या.

ग्रुप बीचं रोमांचक समीकरण

ग्रुप बीचं समीकरण पाहिलं तर रोमांचक परिस्थिती निर्माण झाली आहे. इंग्लंडने दोन्ही सामने जिंकून चार पाईंट्स नावावर केलेत. तर न्यूझीलंडचा एकच सामना झाला असून तो पाकिस्तानविरुद्ध पावसामुळे अनिर्णयीत राहिला होता. तर पाकिस्तानचा दोन सामने झाले असून एख अनिर्णयीत आणि एक इंग्लंडकडून पराभव झाला आहे. तर श्रीलंकेचा एक सामना झाला असून श्रीलंकेला इंग्लंडकडून पराभवाचं तोंड पहावं लागलं होतं.
advertisement

इंग्लंड थेट सेमीफायनलमध्ये कशी? 

इंग्लंडचा एक सामना शिल्लक आहे. न्यूझीलंडविरुद्ध येत्या 27 तारखेला हा सामना होईल. तर दुसरीकडे पाकिस्तानचा देखील एकच सामना शिल्लक आहे. पाकिस्तानने काहीही केलं तरी तीन अंकापर्यंतच त्यांना पोहोचता येईल. म्हणजेच इंग्लंड नेहमीच पाकिस्तानच्या वर राहिल. तर दुसरीकडे न्यूझीलंड आणि श्रीलंका यांचे दोन सामने शिल्लक असून त्यातील एक सामना याच दोन संघात होणार आहे. याचाच अर्थ असा की, दोन्ही पैकी कोणताही एक संघ जिंकेल आणि एका संघाचा पराभव होईल. त्यामुळे पराभूत होणारी टीम चार पाईंट्सपर्यंत पोहोचूच शकत नाही. अशाप्रकारे पाकिस्तान आणि न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यापैकी एक.. पाईंट्स टेबलमध्ये टीम इंग्लंडच्या खाली राहिल. त्यामुळे इंग्लंड टॉप 2 मध्ये असणार आहे.
advertisement

आजच स्पष्ट होणार चित्र 

दरम्यान, न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यातील सामना आज खेळवला जाणार आहे. त्यामुळे ग्रुप बीमधून सेमीफायनलला कोण जाणार? याचं चित्र आजच स्पष्ट होणार आहे. तसेच पाकिस्तानला देखील आजच बॅगा भरून लाहौरचा रस्ता शोधावा लागेल. तर न्यूझीलंड आणि श्रीलंका या दोन्ही संघासाठी आजचा सामना करो या मरो असा असणार आहे. त्यामुळे सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
ENG Into Semis : न्यूझीलंड अन् श्रीलंकेच्या 2-2 मॅच शिल्लक तरीही इंग्लंड थेट सेमीफायनलमध्ये कशी? लॉजिक काय? कुणालाच कळलं नाही
Next Article
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement