advertisement

मुंबईच्या महापौरांच्या हातात 1 कोटींचं Rolex घड्याळ? रितू तावडेंनी खरा फोटोच दाखवला, ट्रोल करणाऱ्यांना धप्पा!

Last Updated:

मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी आपल्याा हातात Rolex Daytona नावाच्या कंपनीचं १ कोटी किंमतीचं घड्याळ घातलं असल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

News18
News18
मुंबई: देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई महापालिकेच्या नवनिर्वाचित महापौर रितू तावडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर कामाला दणक्यात सुरुवात केली. पगार दान करणाच्या निर्णयापासून ते मुंबईतील विकास कामांना प्राधान्य देण्याचा धडाका रितू तावडे यांनी लावला आहे. पण, अशातच रितू तावडे यांनी तब्बल १ कोटी रुपयांचं घड्याळ घातलं असल्याचा आरोप करणारी पोस्ट व्हायरल झाली होती. पण, अखेरीस महापौरांनी हे वृत्त धांदात खोटे असल्याचं सांगितलं आहे.
मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी आपल्याा हातात Rolex Daytona नावाच्या कंपनीचं १ कोटी किंमतीचं घड्याळ घातलं असल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. मुळात Rolex या कंपनीच्या घड्याळी या कोट्यवधी रुपये किंमतीच्या घरात असतात. नुकत्याच महापौर झालेल्या रितू तावडे तब्बल १ कोटींचं घड्याळ वापरत असल्याच्या पोस्ट व्हायरल झाल्यानंतर खुद्द रितू तावडे यांनी या प्रकरणी खुलासा केला आहे.
advertisement
advertisement
रितू तावडे यांनी आपल्या टि्वटर अकाउंटवरून एक पोस्ट केली आहे.  "ही पोस्ट पूर्णपणे खोटी व दिशाभूल करणारी आहे. माझ्या हातातील घड्याळ Michael Kors कंपनीचं आहे, ते Rolex Daytona नाही" असा खुलासा रितू तावडे यांनी केला.
तसंच, Rolex Daytona सारख्याा लाखो-कोट्यवधींची घड्याळ वापरत नाही, त्यामुळे हा प्रश्नच उद्भवत नाही. अफवा पसरवणे हा बेजबाबदारपणा आणि जाणीवपूर्वक बदनामीचा प्रयत्न आहे. अशा खोट्या आरोपांना मी भीक घालत नाही' असा टोलाही रितू तावडेंनी लगावला.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
मुंबईच्या महापौरांच्या हातात 1 कोटींचं Rolex घड्याळ? रितू तावडेंनी खरा फोटोच दाखवला, ट्रोल करणाऱ्यांना धप्पा!
Next Article
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement