advertisement

PAK vs SL : आधी सेमी फायनल, मग लाज घालवली, पाकिस्तानला तोंड दाखवायला जागा उरली नाही!

Last Updated:

श्रीलंकेसमोर 213 धावांचे लक्ष्य ठेवले होते.या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंका 207 धावापर्यंत मजल मारू शकली होती.त्यामुळे त्यांचा 5 धावांनी पराभव झाला होता.

PAK vs SL
PAK vs SL
Pakistan vs Sri Lanka : टी20 वर्ल्डकपमध्ये आज पाकिस्तानने 5 धावांनी श्रीलंकेचा पराभव केला आहे. पाकिस्तानने श्रीलंकेसमोर 213 धावांचे लक्ष्य ठेवले होते.या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंका 207 धावापर्यंत मजल मारू शकली होती.त्यामुळे त्यांचा 5 धावांनी पराभव झाला होता. दरम्यान पाकिस्तानने हा सामना जिंकला असला तरी ती सेमी फायनलला पोहोचू शकणार नाही आहे.कारण पाकिस्तानला 147 धावात रोखायचे होते, पण पाकिस्तानला ते करता न आल्याने ते जिंकून सुद्धा हारले आहे.
पाकिस्तान दिलेल्या 212 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकाची सूरूवात खूपच खराब झाली होती.कारण त्यांचा 8 धावांवर 1 विकेट पडला होता. त्यानंतर श्रीलंका सावरेल असे वाटत होते पण त्यांनी 101 धावात 5 विकेट गमावले होते.
ज्यावेळेस श्रीलंकेचे एकामागून एक विकेट पडत होते. ते पाहता पाकिस्तान श्रीलंकेला लवकरच रोखेल असे वाटत होते. पण मैदानात श्रीलंकेचा कॅप्टन दासून शनाकाच्यी एंन्ट्री झाली होती. ही एंन्ट्री होताच त्याने मॅच फिरवायला सूरूवात केली.
advertisement
दासून शनाकाने शेवटी 31 बॉलमध्ये 76 धावांची नाबाद खेळी केली होती. दासून शनाका ज्यावेळेस मैदानात होता तेव्हा श्रीलंकेला जिंकण्यासाठी खूप धावांची गरज होती आणि बॉल कमी होते. पण दासून शनाका एकट्याचा बळावर मॅच खेचून आणली. शेवटच्या ओव्हरला पाकिस्तानला 28 धावांची गरज होती. यावेळी शनाका आफ्रीदला एक चौकार आणि तीन षटकार मारले होते. त्यानंतर 2 बॉलमध्ये 6 धावांची गरज होती. त्यावेळी शाहीन आफ्रिदीने वाईट बॉल टाकला तो अंपायरने दिलाच नाही आणि शेवटच्या बॉलवर त्याने पुन्हा कोपऱ्यात बॉल टाकला जो शनाकाला मारला आला नाही आणि श्रीलंकेचा 5 धावांनी पराभव झाला.
advertisement
पाकिस्तानकडून साहिबजादा फरहान आणि फखर जमान फलंदाजीला उतरले होते. या दोघांनी पाकिस्तानच्या डावाची चांगली सूरूवात करत पहिल्या विकेटसाठी 176 धावांची सर्वाधिक पार्टनरशीप केली होती.ही टी20 वर्ल्डकपमधली आतापर्यतची सर्वाधिक पार्टनरशीप होती.फकर जमानच्या 84 धावा आणि साहिबजादा
फरहानच्या शतकीय खेळीच्या बळावर पाकिस्तानने 212 धावा ठोकल्या होत्या. त्यामुळे श्रीलंकेसमोर 213 धावांचे लक्ष्य होते.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
PAK vs SL : आधी सेमी फायनल, मग लाज घालवली, पाकिस्तानला तोंड दाखवायला जागा उरली नाही!
Next Article
advertisement
इराणविरुद्धचे युद्ध जिंकणे अमेरिकेच्या औकातीबाहेर, चक्रव्यूहात फसला 'सुपरपॉवर'; ट्रम्प यांनी केली जगातील सर्वात मोठी लष्करी घोडचूक
इराणविरुद्धचे युद्ध जिंकणे अमेरिकेच्या औकातीबाहेर, चक्रव्यूहात फसला 'सुपरपॉवर'
  • इराण म्हणजे व्हेनेझुएला नाही!

  • अमेरिकेने छेडला मधमाश्यांचा मोहोळ

  • डोनाल्ड ट्रम्प यांचा आत्मघातकी डाव

View All
advertisement