Bike Engine Oil : बाईकचं इंजिन 'जाम' होण्यापूर्वी देते 'हे' 5 संकेत; ऑइल बदलण्याची योग्य वेळ कशी ओळखाल?
- Published by:Devika Shinde
Last Updated:
अनेकांना वाटतं की अरे हे बदलायचं कधी असतं हे आधीच कळालं तर किती बरं होईल... खरंतर तुमची बाईक ऑइल बदलण्यासाठी ओरडून सांगत असते, फक्त तुम्हाला तिचे 'हे' संकेत ओळखता आले पाहिजेत. ते कसं ओळखायचं? चला जाणून घेऊ ते 5 संकेत.
advertisement
जसं आपल्या शरीराला रक्ताची गरज असते, तसंच बाईकच्या इंजिनला 'इंजिन ऑइल' ची गरज असते. अनेकदा आपण फक्त पेट्रोल भरतो आणि गाडी पळवतो, पण इंजिन ऑइल बदलायला विसरतो. यामुळे इंजिनमध्ये घर्षण वाढून ते कायमचं खराब होऊ शकतं आणि मग खिशाला मोठा फटका बसतो. अशावेळी अनेकांना वाटतं की अरे हे बदलायचं कधी असतं हे आधीच कळालं तर किती बरं होईल... खरंतर तुमची बाईक ऑइल बदलण्यासाठी ओरडून सांगत असते, फक्त तुम्हाला तिचे 'हे' संकेत ओळखता आले पाहिजेत. ते कसं ओळखायचं? चला जाणून घेऊ ते 5 संकेत.
advertisement
1. डॅशबोर्डवरील 'तो' छोटा दिवा (Indicator Light)आजकालच्या बहुतांश स्मार्ट बाईक्समध्ये डॅशबोर्डवर ऑइल इंडिकेटर दिलेला असतो. जर गाडी चालवताना हा दिवा लुकलुकू लागला किंवा लाल झाला, तर याचा अर्थ इंजिनमध्ये ऑइलची पातळी कमी झाली आहे किंवा ऑइल खराब झालं आहे. हा इशारा मिळताच ताबडतोब जवळच्या गॅरेजमध्ये जाणं हिताचं असतं.
advertisement
2. इंजिनचा 'खसाखसा' आवाज येणेतुमच्या बाईकचा आवाज अचानक बदलला आहे का? जर इंजिनमधून धातू एकमेकांवर घासल्यासारखा किंवा पूर्वीपेक्षा जास्त मोठा आवाज येत असेल, तर समजून जा की ऑइल आता पाण्यासारखं पातळ झालं आहे. चांगल्या ऑइलमुळे इंजिनचे भाग स्मूथ चालतात, पण ते खराब झालं की इंजिनमध्ये 'खसाखसा' आवाज येऊ लागतो.
advertisement
advertisement
4. रंगावरून ओळखा ऑइलची 'क्वालिटी'ताजं किंवा नवीन इंजिन ऑइल हे मध किंवा हलक्या तपकिरी रंगाचं असतं. जशी बाईक चालते, तसा या ऑइलमध्ये कार्बन जमा होतो.कसं तपासावे?इंजिनची ऑइल डिपस्टिक बाहेर काढा आणि थोडं ऑइल बोटावर घेऊन पहा. जर ते पूर्णपणे काळं पडलं असेल आणि त्यात चिकटपणा कमी झाला असेल, तर नवीन ऑइल टाकण्याची वेळ आली आहे.
advertisement
5. ऑइलची पातळी कमी होणे (Oil Level Check)इंजिनच्या बाजूला असलेल्या छोट्या काचेच्या खिडकीतून (Inspection Window) तुम्ही ऑइलची पातळी सहज पाहू शकता. जर ऑइल 'Low' मार्कच्या खाली गेलं असेल, तर इंजिन गरम होण्याची (Overheating) भीती असते. उन्हाळ्यात ऑइल लवकर कमी होण्याची शक्यता असते, त्यामुळे महिन्यातून एकदा ही पातळी स्वतः तपासायला हवी.
advertisement
advertisement








