Two whorl on Head : डोक्यावर दोन भोवरे असणाऱ्यांचे दोन लग्न होतात? ही अफवा की वास्तव? वाचा सविस्तर
- Published by:Devika Shinde
Last Updated:
तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, जगातील केवळ 5 टक्के लोकांच्या डोक्यावर दोन भोवरे असतात. त्यामुळे ही एक दुर्मिळ शारीरिक स्थिती आहे. विज्ञानाच्या मते, याचा संबंध मेंदूच्या विकासाशी किंवा भविष्याशी जोडणं चुकीचं आहे.
आपण अनेकदा एक वाक्य ऐकलं असेल, "अरे, याच्या डोक्यावर तर दोन भोवरे आहेत, याचे नक्की दोन लग्न होणार" आपल्याकडे लहान मुलांच्या डोक्यावर दोन भोवरे दिसले की, आजी-आजोबा किंवा शेजारीपाजारी गंमतीने किंवा चिडवण्यासाठी हे हमखास बोलतात. पण कधी विचार केलाय का, की खरंच डोक्यावरच्या केसांच्या रचनेचा आणि आपल्या लग्नाचा काही संबंध असू शकतो? की ही केवळ एक पिढ्यानपिढ्या चालत आलेली अंधश्रद्धा आहे?
advertisement
advertisement
विज्ञानाचं काय आहे म्हणणं?आपल्या डोक्यावर भोवरा असणं ही पूर्णपणे एक शारीरिक आणि अनुवंशिक रचना आहे.अमेरिकेतील नॅशनल ह्युमन जीनोम रिसर्च इन्स्टिट्यूट (NHGRI) नुसार, डोक्यावर किती भोवरे असावेत हे तुमच्या 'डीएनए'वर (DNA) अवलंबून असतं. जर तुमच्या आई-वडिलांच्या किंवा पूर्वजांच्या डोक्यावर दोन भोवरे असतील, तर ते गुणसूत्र तुमच्यात येण्याची शक्यता जास्त असते.तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, जगातील केवळ 5 टक्के लोकांच्या डोक्यावर दोन भोवरे असतात. त्यामुळे ही एक दुर्मिळ शारीरिक स्थिती आहे. विज्ञानाच्या मते, याचा संबंध मेंदूच्या विकासाशी किंवा भविष्याशी जोडणं चुकीचं आहे.
advertisement
भारतीय ज्योतिषशास्त्रानुसार, शरीरावरील प्रत्येक खुणेचा काहीतरी अर्थ असतो. दोन भोवरे असणाऱ्या व्यक्तींबद्दल ज्योतिषशास्त्रात काही रंजक गोष्टी सांगितल्या जातात:स्वभाव: अशी माणसं स्वभावाने अत्यंत शांत, संयमी आणि मनमिळावू असतात. दुसऱ्यांना मदत करण्यात त्यांना आनंद मिळतो.नेतृत्वगुण: दोन भोवरे असलेल्या व्यक्तींमध्ये कल्पकता (Creativity) जास्त असते. ते चौकटीबाहेरचा विचार करणारे आणि उत्तम नेतृत्व करणारे असतात, असं मानलं जातं.वैवाहिक आयुष्य: ज्योतिषशास्त्रात अशी एक मान्यता आहे की, दोन भोवरे असल्यास वैवाहिक आयुष्यात चढ-उतार येऊ शकतात. काही जुन्या समजुतीनुसार यामुळे दुसऱ्या लग्नाचा योग येतो असं म्हटलं जातं, पण याला कोणताही ठोस आधार नाही.
advertisement
मग 'दोन लग्नांची' चर्चा कुठून आली?पूर्वीच्या काळी जेव्हा विज्ञानाचा प्रसार झाला नव्हता, तेव्हा लोक शरीराच्या विचित्र किंवा दुर्मिळ रचनेला नशिबाशी जोडायचे. दोन भोवरे ही दुर्मिळ गोष्ट असल्याने त्याभोवती अशा कथा विणल्या गेल्या. प्रत्यक्षात, कोणाचं लग्न टिकणं किंवा न टिकणं हे त्या व्यक्तीचा स्वभाव, सामंजस्य आणि परिस्थितीवर अवलंबून असतं, डोक्यावरच्या केसांच्या भोवऱ्यावर नाही.
advertisement
एक रंजक निरीक्षण (Fact Check)काही अभ्यासांनुसार, डोक्यावरचा भोवरा घड्याळाच्या काट्याच्या दिशेने (Clockwise) आहे की विरुद्ध दिशेने (Counter-clockwise), याचा संबंध तुम्ही 'उजव्या हाताने' काम करता की 'डाव्या हाताने', याच्याशी जोडला जातो. जरी हे पूर्णपणे सिद्ध झालेलं नसलं तरी, विज्ञानासाठी हा संशोधनाचा विषय आहे.
advertisement







