World War III:...तर 3 देशांमध्ये होईल महायुद्ध, अमेरिकेला मोजावी लागणार किंमत? SPECIAL REPORT
- Published by:Sachin S
Last Updated:
अमेरिकेच्या पश्चिम आशियातील अॅक्शनमुळे जगभरात खळबळ उडाली आहे. अमेरिकेनं इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह रुहोल्ला खोमेनी यांची चहुबाजूनं नाकाबंदी करण्यास सुरुवात केली आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेला इशारा अखेर सत्यात उतरवून दाखवला आहे. अमेरिकेनं सैन्याने शनिवारी सकाळी इराणवर हल्ला चढवला. यामुळं जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर पोहचलंय. अमेरिकेनं इराणची चोहोबाजूनं कोंडी केली आहे. तर इस्त्रायल आणि अमेरिकेनं इराणवर संयुक्त हल्ला केला आहे. तर इराणनंही पलटवार करत तब्बल सात देशांवर हल्ले केले आहेत. विशेष म्हणजे, इराणला रशिया आणि तुर्कीचीही रसद मिळू शकते. त्यामुळे तीन देशांमधील युद्धामुळे जागतिक महायुद्धाची भीती निर्माण झाली आहे.
अमेरिकेच्या पश्चिम आशियातील अॅक्शनमुळे जगभरात खळबळ उडाली आहे. अमेरिकेनं इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह रुहोल्ला खोमेनी यांची चहुबाजूनं नाकाबंदी करण्यास सुरुवात केली आहे. इराणला अमेरिकेच्या सैन्यानं जणू वेढा घातला आहे. जिब्राल्टरपासून आखातापर्यंत ठिकठिकाणी अमेरिकेनं सैन्य तैनात केलं आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी इराणावर लष्करी हल्ला केला जाण्याची शक्यता आहे. पण, असं असलं तरी अयातुल्लाह खोमेनी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. तसंच अमेरिकेच्या धमक्यांना जशास तसं उत्तर इराणाकडून दिलं जात आहे. ना त्यांना अमेरिकेचं महाकाय एयरक्राफ्ट कॅरियर USS अब्राहम लिंकनची भिती वाटतेय.. ना त्यांना USS गेराल्ड आर. फोर्डची तमा आहे.
advertisement
इराणकडून दिल्या जाणाऱ्या वक्तव्यातून एक गोष्ट स्पष्ट झाली आणि ती म्हणजे अयातुल्लाह खोमेनी यांनी ही खास रणनीती आखली आहे. पण संरक्षण तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, ही खोमेनी यांची सर्वात मोठी चूक ठरणार आहे.
अमेरिकेनं का केला हल्ला?
- इराणनं यूरेनियम शुद्धता संवर्धन तत्काळ थांबवावं
- इराणनं आपल्या क्षेपणास्त्रांची रेंज कमी करावी
advertisement
- तसंच इराणनं शेजरी देशातील दहशतवादी संघटांना मदत थांबवावी
या अटी शर्ती अमेरिकेनं घातल्या आहे. पण या अटी मान्य करणं म्हणजे इराणनं अमेरिकेसमोर एक प्रकारे शरणागती पत्करण्या सारखं ठरणार आहे. इराणनं अण्वस्त्र निर्मिती प्रकल्प रोखावा, असं अमेरिकेला वाटतंय. आपल्या क्षेपणास्त्रांची रेंज कमी करावी पण हिच इराणची खरी ताकद आहे. या अटी शर्ती इराणसाठी आत्मघातकी ठरणार आहेत. इराणनं अमेरिकेच्या अटी शर्ती मान्य केल्यास इराण सरकारचा पाया ढासळणार हे खोमेनी पुरते जाणून आहेत. त्यासाठी मर्यादीत युद्ध पत्करण्याची इरणाची तयारी आहे. ही खोमेनींच्या अस्तित्वाची लढाई आहे.
advertisement
पेट्रो-डिझेलचे दर वाढणार?
कारण युद्ध सुरू झाल्यास इराणाचा सर्वोच्च नेता अमेरिकीच्या क्षेपणास्त्रांच्या टार्गेटवर असणार आहेत. त्यामुळे खोमेनींचं तीन दशकांपासूनचं साम्राज्य एका झटक्यात संपणार आहे. इराणची अर्थव्यवस्था पूर्वीपासूनचं निर्बंधांमध्ये अडकली आहे.अशातचं अमेरिकेनं इरणाच्या तेल विहिरींवर हल्ला केल्यास इराणाची मोठी पिछेहाट होणार आहे. पेट्रोल-डीझेलच्या किंमती आकाशाला भिडण्याची शक्यता आहे. अमेरिकेकडून इराणच्या निवडक ठिकाणांवर हल्ले केले जाण्याची शक्यता आहे. त्यात लष्करी तळ आणि सरकारी कार्यालयांचा समावेश असणार आहे.
advertisement
युद्धाचे चटके अमेरिकेलाही सहन करावे लागणार
इकडं इराणी जनतेत सरकार विरोधातील असंतोष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. पुन्हा जनता तेहरानच्या रस्त्यांवर उतरण्याची शक्यता नाकारता येत नाही. युद्धाचे चटके केवळ इराणाचं नाही तर अमेरिकेलाही सहन करावे लागणार आहेत. कागदावर ठरल्याप्रमाणे युद्ध होत नाहीत. इराणाकडं असलेल्या घातक क्षेपणास्त्रांचा सामना अमेरिकेला सहन करावा लागणार आहे. अमेरिकेच्या हल्ल्यानंतर खोमेनी सरकार कोसळल्यास पश्चिम आशियात पुन्हा एकदा कट्टरवादाला बळ मिळण्याची शक्यता आहे. ती अमेरिकेसाठी डोकेदुखी ठरणार आहे.
advertisement
अमेरिका आणि इराण दरम्यानच्या तनावामुळे पश्चिम आशियातील परिस्थिती स्फोटक बनली आहे. दोन्ही देशांनी सामंजस्याची भूमिका न घेतल्यास युद्धाचा भडका उडण्याची शक्यता आहे. आणि त्याचे परिणाम संपूर्ण जगाला भोगावे लागणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 28, 2026 10:48 PM IST
मराठी बातम्या/विदेश/
World War III:...तर 3 देशांमध्ये होईल महायुद्ध, अमेरिकेला मोजावी लागणार किंमत? SPECIAL REPORT








