advertisement

VIDEO : 'ए चल हड...', कुलदीपला रोहितने झापलं,कधी नव्हे ते भेटले अन् वानखेडेच्या मैदानावर वाजलं

Last Updated:

एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये रोहित शर्मा आणि कुलदीप यादव यांच्यात वाजल्याचे दिसते आहे. या व्हिडिओची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा रंगली आहे.

Rohit Sharma Kuldeep Yadav Video
Rohit Sharma Kuldeep Yadav Video
Rohit Sharma Kuldeep Yadav Video : टी20 वर्ल्ड कप 2026 च्या दुसऱ्या सेमी फायनल सामन्यात गुरूवारी टीम इंडियाने 7 धावांनी इंग्लंडचा पराभव केला होता. हा सामना जिंकून टीम इंडिया फायनलला पोहोचली आहे.आता भारत फायनलमध्ये न्यूझीलंडशी भिडणार आहे. हा सामना 8 मार्च 2026 ला नरेंद्र मोदी स्टेडिअमला खेळवला जाणार आहे. या सामन्याची चाहत्यांना प्रचंड उत्सुकता लागली आहे. असे असताना एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये रोहित शर्मा आणि कुलदीप यादव यांच्यात वाजल्याचे दिसते आहे. या व्हिडिओची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा रंगली आहे.
खरं तर भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा सेमी फायनलचा सामना हा मुंबईच्या वानखेडेच्या मैदानावर खेळवण्यात आला होता. हा सामना मुंबईत असल्याने आणि टी20 वर्ल्डकपचा ब्रॅड अॅम्बेसेडर असल्याने रोहित शर्मा देखील वानखेडेवर उपस्थि होता. यावेळी तो आपल्या टीम इंडियातील सहकाऱ्यांना देखील भेटला होता. या संदर्भातला व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता.
advertisement
या दरम्यान रोहित शर्माची कुलदीप यादवने देखील भेट घेतली होती. कुलदीप आधीच मैदानात प्रॅक्टीस करत होता,त्यामुळे तो मैदानात घामाघूम झाला होता, त्यामुळे अशा घामाटलेल्या अवस्थेतही तो रोहितची गळाभेट करायला गेला होता.पण कुलदीप घामाघुम असल्याचे पाहून रोहित शर्माने त्याला 'ए चल हड...' असे म्हणत हाकललं आणि त्यानंतर हाताला लागलेला घाम त्याने पुसला. त्यानंतर दोघांमध्ये काहीशी चर्चा झाली आणि नंतर रोहित त्याला शेकहँड करून निघून गेला. पुढे रोहित शर्माने इतर दुसऱ्या खेळाडूंची देखील भेट घेतले.
advertisement
दरम्यान मैदानावर रोहित शर्मा आणि कुलदीप यादवच एक वेगळं नातं आहे. रोहित शर्मा अनेकदा कुलदीप यादवला फटकारताना दिसला आहे. कारण कुलदीप यादवला प्रत्येक अपीलवर डिआरएस घ्यायचं असतं. हीच गोष्ट रोहितला पटत नसल्याने तो नेहमी कुलदीपची मैदानावर शाळा घेत असतो. विशेष म्हणजे रोहितच्या अशा वागण्याचं कुलदीपला अजिबात वाईट वाटत नाही.कारण तो म्हणतो रोहित शर्मा हा सिनिअर खेळाडू आहे.त्यामुळे त्याच्या बोलण्याच मला वाईट वाटत नाही.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
VIDEO : 'ए चल हड...', कुलदीपला रोहितने झापलं,कधी नव्हे ते भेटले अन् वानखेडेच्या मैदानावर वाजलं
Next Article
advertisement
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार, कोणालाच माहिती नाही भारताचा 'बॅकअप प्लॅन'
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार
  • पेट्रोल-डिझेलच्या साठ्याबाबत मोठी अपडेट

  • जाणून घ्या किती दिवस पुरेल तेलसाठा

  • भारताचे 'ऑईल सिक्रेट' पहिल्यांदाच कळाले

View All
advertisement