Supplements : सप्लिमेंट्स घेताय ? डॉक्टरांचा सल्ला घेतला की नाही ? ही माहिती आधी वाचा
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
थकवा दूर करण्यासाठी लोह म्हणजेच आयर्नच्या गोळ्या, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी झिंकच्या गोळ्या आणि त्वचेच्या काळजीसाठी व्हिटॅमिन सीच्या गोळ्या हे माहित असतं. पण काही सप्लिमेंटस् एकत्र घेणं हानिकारक असू शकतं, त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय शक्यतो सप्लिमेंटस घेऊ नका.
मुंबई : बरं वाटत नसेल तेव्हा आधी घरी उपचार, गरज लागली तर डॉक्टरकडे जाणं असा पूर्वीचा शिरस्ता होता. पण आता सोशल मीडियावर आरोग्याद्दल जागरूकता पूर्वीपेक्षा जास्त वाढली आहे. म्हणूनच अनेक लोक त्यांच्या शरीरातील जीवनसत्त्वं आणि पोषक घटकांची कमतरता दूर करण्यासाठी सप्लिमेंटस घेतात.
थकवा दूर करण्यासाठी लोह म्हणजेच आयर्नच्या गोळ्या, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी झिंकच्या गोळ्या आणि त्वचेच्या काळजीसाठी व्हिटॅमिन सीच्या गोळ्या हे माहित असतं. पण काही सप्लिमेंटस् एकत्र घेणं हानिकारक असू शकतं, त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय शक्यतो सप्लिमेंटस घेऊ नका.
advertisement
आहार तज्ज्ञ एमी मार्गुलीज यांच्या मते, सप्लिमेंटस् घेण्याची योग्य वेळ विचारात घेणं अत्यंत महत्वाचं आहे, कारण काही जीवनसत्त्वं आणि खनिजे एकमेकांच्या परिणामकारकतेला बाधा आणणारे ठरू शकतात.
लोह आणि कॅल्शियम - लोहाच्या कमतरतेवर उपचार करण्यासाठी, ज्याला अशक्तपणा देखील म्हणतात, लोहाच्या गोळ्या अनेकदा लिहून दिल्या जातात. यामुळे शरीराला लाल रक्तपेशी तयार करण्यास मदत होते. ज्यामुळे संपूर्ण शरीरात ऑक्सिजनचा प्रवाह चांगला होतो.
advertisement
मजबूत हाडं आणि दातांसाठी कॅल्शियम आवश्यक आहे. पण, एकत्र घेतल्यानं, कॅल्शियम आतड्यांमधे लोहाचं शोषण कमी करू शकतं. यामुळे लोह पूरक पदार्थांचा प्रभाव कमी होऊ शकतो आणि बद्धकोष्ठता, गॅस किंवा मळमळ यासारख्या पोटाच्या समस्या देखील उद्भवू शकतात. म्हणून, डॉक्टर त्यांना किमान दोन तासांच्या अंतरानं घेण्याची शिफारस करतात.
लोह आणि जस्त - रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी आणि संसर्गापासून संरक्षण करण्यासाठी झिंक उपयुक्त आहे. पण आयर्न म्हणजेच लोह आणि जस्त म्हणजेच झिंक दोन्ही एकत्र घेतल्यानं ते एकमेकांच्या शोषणासाठी स्पर्धा करू शकतात.
advertisement
यामुळे दोन्ही खनिजांचे फायदे कमी होऊ शकतात आणि पोटदुखी, पेटके येणं किंवा अतिसार होण्याची शक्यता असते. म्हणून, हे सप्लिमेंट्स किमान दोन तासांच्या अंतरानं घेण्याची शिफारस डॉक्टर करतात.
तांबं आणि जस्त - तांबं हे ऊर्जा, मज्जातंतूंचं आरोग्य आणि रोगप्रतिकारक शक्तीसाठी आवश्यक आहे. पण, जास्त प्रमाणात झिंक सेवन तांब्याच्या शोषणात व्यत्यय आणू शकतं. या दीर्घकालीन परिणामामुळे तांब्याची कमतरता निर्माण होऊ शकते, ज्यामुळे अशक्तपणा येणं, प्रतिकारशक्ती कमकुवत होणं किंवा मज्जातंतूंच्या समस्या उद्भवू शकतात. म्हणून, या दोन्ही सप्लिमेंटस वेगवेगळ्या वेळी घेणं चांगलं.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 06, 2026 8:53 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Supplements : सप्लिमेंट्स घेताय ? डॉक्टरांचा सल्ला घेतला की नाही ? ही माहिती आधी वाचा









