advertisement

Obesity : लहानपणची स्थूलता मोठेपणी पडतं भारी, कर्करोगाचा वाढतो धोका, वेळेत व्हा सावध

Last Updated:

पेडियाट्रिक ऑन्कोलॉजी, हेमॅटोलॉजी आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांट कन्सल्टंट डॉ. स्वाती यांच्या मते, बालपणातील लठ्ठपणामुळे आयुष्यात नंतर हार्मोनशी संबंधित कर्करोग होऊ शकतात. बालपणात जास्त वजन असल्यानं भविष्यात कर्करोग होण्याचा धोका 9% ते 30% वाढतो असं संशोधनात दिसून आलं आहे.

News18
News18
मुंबई : मैदानी खेळांचं प्रमाण आता कमी झालंय. त्यामुळे, आजकालची अनेक मुलं मोबाईल फोन आणि टीव्ही/ ओटीटी प्लॅटफॉर्मला जास्त धरुन असतात. त्यामुळे त्यांचा बराचसा वेळ घरातच जातो.
घरात वेळ घालवण्यानं मुलांचा दृष्टी, बुद्ध्यांक आणि सामाजिक कौशल्यांवर नकारात्मक परिणाम होतोच, तसंच गंभीर आजारांचा धोकाखील निर्माण होतो. वाढत्या वजनामुळे भविष्यात कर्करोग होऊ शकतो.
पेडियाट्रिक ऑन्कोलॉजी, हेमॅटोलॉजी आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांट कन्सल्टंट डॉ. स्वाती यांच्या मते, बालपणातील लठ्ठपणामुळे आयुष्यात नंतर हार्मोनशी संबंधित कर्करोग होऊ शकतात. बालपणात जास्त वजन असल्यानं भविष्यात कर्करोग होण्याचा धोका 9% ते 30% वाढतो असं संशोधनात दिसून आलं आहे.
advertisement
जास्त वजन असलेल्या मुलाच्या शरीराचे जैविक वातावरण कर्करोगाच्या पेशी वाढण्यासाठी सुपीक माती म्हणून काम करतं. आपण अनेकदा कर्करोगासाठी मायक्रोवेव्ह, प्लास्टिक किंवा पॉलिश केलेलं अन्न जबाबदार धरतो, पण शरीर निरोगी आणि तंदुरुस्त ठेवणं हाच धोका दूर करण्याचा एकमेव मार्ग आहे.
advertisement
लठ्ठपणामुळे सतत सौम्य सूज, हार्मोनल असंतुलन होऊ शकतं. हे घटक कर्करोगास कारणीभूत ठरू शकतात.
'अतिरिक्त चरबी'मुळे मुलाच्या आरोग्याचं कसं नुकसान होतं समजून घेऊया. बालपणातील लठ्ठपणामुळे केवळ कर्करोगच नाही तर प्रौढावस्थेत उच्च रक्तदाब, मधुमेह, स्लीप एपनिया, दमा आणि हाडं आणि सांध्यांच्या समस्या देखील होऊ शकतात.
लठ्ठपणामुळे ल्युकेमिया, हॉजकिन्स, स्तन, अन्ननलिका, पोट, कोलोरेक्टल, एंडोमेट्रियल, डिम्बग्रंथि, थायरॉईड आणि स्वादुपिंडाच्या कर्करोगाचा धोका वाढतो.
advertisement
तरुण मुलींमध्ये लठ्ठपणामुळे तारुण्य खूप लवकर किंवा खूप उशिरा येऊ शकते. ही स्थिती नंतरच्या आयुष्यात स्तन आणि पुनरुत्पादक अवयवांच्या कर्करोगासाठी एक प्रमुख जोखीम घटक ठरु शकते. शिवाय, जर एखादं मूल ल्युकेमिया म्हणजे रक्ताचा कर्करोगासारख्या आजाराशी झुंजत असेल आणि ते लठ्ठ असेल तर त्यांच्यासाठी केमोथेरपी पूर्ण करणं खूप कठीण होऊ शकते. लठ्ठपणा हे देखील कर्करोगाच्या मृत्यूचं एक प्रमुख कारण आहे.
advertisement
'नॉर्मल वेट ओबेसिटी'चा धोका - शास्त्रज्ञांच्या मते, मुलांचे रक्तातील कोलेस्टेरॉल, साखर किंवा रक्तदाब सामान्य असला तरीही त्यांचा बीएमआय कर्करोगासाठी एक महत्त्वाचा घटक आहे. सामान्य वजनाच्या स्थूलपणावरही अभ्यास केला जातो आहे. म्हणजेच मुलाचं वजन आणि बीएमआय सामान्य आहे परंतु शरीरातील चरबीचं प्रमाण जास्त आहे. याचा संबंध बालपणातील कर्करोगाशी देखील जोडला जात आहे.
advertisement
मुलाचं वजन योग्य प्रमाणात वाढलं नाही तरी, निरोगी जीवनशैली अंगीकारल्यानं कर्करोगाचा धोका लक्षणीयरीत्या कमी होऊ शकतो:
पाच वर्षांखालील मुलांसाठी: ते शारीरिकदृष्ट्या सक्रिय खेळात सहभागी होतील याची खात्री करा.
सहा ते अठरा वर्ष वयोगटातील मुलांसाठी: दररोज एक ते दोन तास जोरदार शारीरिक हालचाल करणं आवश्यक आहे. यात सायकलिंग, खेळ, धावणं, उडी मारणं आणि लटकणं यांचा समावेश असावा.
advertisement
खाण्यापिण्यात बदल: ऑनलाइन अन्न ऑर्डर करण्याऐवजी, संपूर्ण कुटुंबासह घरी शिजवलेलं जेवण खाण्यावर लक्ष केंद्रित करा. मुलांना हंगामी फळं आणि भाज्या द्या आणि त्यांना थंड पेयांपासून दूर ठेवा.
स्क्रीन टाइम आणि झोप: मुलांचा मोबाईल फोन आणि टीव्हीवरील वेळ कमी करा, त्यांना शारीरिक हालचाली करण्यास प्रोत्साहित करा आणि त्यांना पुरेशी आणि शांत झोप मिळेल याची खात्री करा.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Obesity : लहानपणची स्थूलता मोठेपणी पडतं भारी, कर्करोगाचा वाढतो धोका, वेळेत व्हा सावध
Next Article
advertisement
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार, कोणालाच माहिती नाही भारताचा 'बॅकअप प्लॅन'
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार
  • पेट्रोल-डिझेलच्या साठ्याबाबत मोठी अपडेट

  • जाणून घ्या किती दिवस पुरेल तेलसाठा

  • भारताचे 'ऑईल सिक्रेट' पहिल्यांदाच कळाले

View All
advertisement