Instagramवर 1 लाख व्ह्यूज आल्यावर किती कमाई होते? जाणून घ्या पैसे कमावण्याची ट्रिक
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Instagram Tips: सध्याच्या काळात सोशल मीडिया फक्त मनोरंजनाचं साधन राहिलेलं नाही, तर कमाईचाही मोठा प्लॅटफॉर्म बनला आहे. पण यावरुन कशी कमाई करता येते? चला पाहूया.
Instagram Tips in Marathi: स्मार्टफोन वापरणाऱ्यांची संख्या ही दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. जे स्मार्टफोन वापरतात ते नक्कीच सोशल मीडियाचा वापर करतात. यात इंस्टाग्राम हे सर्वात आघाडीवर आहे. इंस्टाग्रामचा वापर लोक फक्त एंटरटेनमेंटसाठीच नाही तर पैसे कमावण्यासाठीही करत आहेत. यावर लाखो लोक व्हिडिओ आणि रिल्स बनवून चांगली कमाई करत आहेत. अशावेळी लोकांच्या मनात नेहमीच प्रश्न उपस्थित होतो की, त्यांच्या व्हिडिओ किंवा रीलवर 1 लाख व्ह्यूज आले तर त्यांतून किती कमाई होईल?
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
Affiliate Marketing नेही होते कमाई : इंस्टाग्रामवर पैसे कमवण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे अ‍ॅफिलिएट मार्केटिंग. यामध्ये, क्रिएटर कंपनीच्या प्रोडक्टच्या लिंक्स शेअर करतात. जेव्हा लोक त्या लिंकद्वारे खरेदी करतात तेव्हा क्रिएटरला कमिशन मिळते. तुमच्या व्हिडिओला जास्त व्ह्यूज मिळाले तर त्या लिंकवर क्लिक करणाऱ्या लोकांची संख्या देखील वाढते, ज्यामुळे लक्षणीय कमाई होऊ शकते.
advertisement
कंटेंट आणि ऑडियन्स सर्वात आवश्यक : इंस्टाग्रामवर कमाईचं खरं रहस्य चागंला आणि इंट्रेस्टिंग कंटेंट तयार करणे आहे. तुमचे व्हिडिओ लाखो लोकांना पसंत येत असतील आणि ते जास्त शेअर होत असतील तर व्ह्यूज वेगाने वाढतात. यामुळे तुम्हाला इंस्टाग्रामवर कमाई करायची असेल तर फक्त व्ह्यूजवर लक्ष देण्याऐवजी तुमच्या ऑडियन्स आणि कंटेंट क्वालिटी चांगली बनवण्यावर फोकस करणे जास्त गरजेचे आहे.








