Nath Shashtri 2026: छ. संभाजीनगरमधील ऐतिहासिक मंदिर, थेट संत एकनाथ महाराजांशी कनेक्शन, पाहा Video
- Reported by:Apurva Pradip Talnikar
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Nath Shashti 2026: छत्रपती संभाजीनगरमधील औरंगपुरा भागात असलेले नाथ मंदिर हे संत एकनाथ महाराजांच्या आठवणींशी जोडलेले ठिकाण मानले जाते.
छत्रपती संभाजीनगर : संत एकनाथ महाराज यांच्या नाथ षष्ठीच्या निमित्ताने पैठणसह छत्रपती संभाजीनगर शहरातही भाविकांमध्ये उत्साह पाहायला मिळतो. शहरातील औरंगपुरा भागात असलेले नाथ मंदिर हे संत एकनाथ महाराजांच्या आठवणींशी जोडलेले ठिकाण मानले जाते. या मंदिरात सुमारे 450 वर्षांपूर्वीच्या काही देव-देवतांच्या मूर्ती आजही जतन केलेल्या आहेत. याबाबत लोकल18 च्या माध्यमातून जाणून घेऊ.
पूर्वी या मंदिराला विठ्ठल-रुक्मिणी मंदिर म्हणून ओळखले जात असे. त्या काळात येथे काळ्या पाषाणातील विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्तींसह विष्णू भगवंत, महालक्ष्मी, विजय पांडुरंग (बालाजी), राधा-कृष्ण तसेच गायी-वासरांच्या मूर्ती होत्या. या मूर्तींपैकी काही मूर्ती आजही मंदिरात ठेवलेल्या असून त्यांची दररोज पूजा केली जाते.
advertisement
माहितीनुसार, संत एकनाथ महाराज पैठणहून देवगिरी (दौलताबाद) येथे आपल्या गुरू जनार्दन स्वामी यांच्या दर्शनासाठी जात असताना औरंगपुरा येथील या मंदिरात मुक्काम करत असत. त्या काळात मंदिर लाकडी वाड्यात होते. येथेच ते देव-देवतांची पूजा करीत, अशी परंपरा सांगितली जाते.
संत एकनाथ महाराजांनी 1599 मध्ये देह ठेवला. त्यानंतर भक्तांनी या मंदिराला ‘नाथ मंदिर’ असे नाव दिले. 1960 मध्ये मंदिरासाठी विश्वस्त मंडळ स्थापन झाले. पुढे 2004 मध्ये मंदिराचा जीर्णोद्धार करून नाथ महाराजांची संगमरवरी मूर्ती येथे बसविण्यात आली. आज नाथ मंदिरात महाराजांच्या मूर्तीच्या बाजूला काही जुन्या मूर्ती ठेवलेल्या असून भाविकांना त्यांचे दर्शन घेता येते. नाथ षष्ठीच्या दिवशी येथे भाविकांची विशेष गर्दी पाहायला मिळते.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
Mar 06, 2026 1:25 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Nath Shashtri 2026: छ. संभाजीनगरमधील ऐतिहासिक मंदिर, थेट संत एकनाथ महाराजांशी कनेक्शन, पाहा Video







