Currency : कुवैतमध्ये भारतीय रुपयाला किंमत किती? 1 कुवैती दीनारसाठी किती रुपये मोजावे लागतील?
- Published by:Devika Shinde
Last Updated:
कुवैती दीनार हे जगातील सर्वात मौल्यवान चलन मानलं जातं. अनेक भारतीय कुटुंबांचा उदरनिर्वाह कुवैतमधून येणाऱ्या पैशांवर चालतो. कारण अनेक भारतीय लोक हे कुवैतमध्ये काम करण्यासाठी गेले आहेत.
परदेशात नोकरी किंवा व्यवसायासाठी जाणाऱ्या भारतीयांची पहिली पसंती असते ती म्हणजे 'खाडी देश'. त्यातही 'कुवैत' (Kuwait) हे नाव अशा लोकांसाठी आकर्षणाचं केंद्र आहे, ज्यांना आपल्या कष्टाचं फळ जास्तीत जास्त मोबदल्यात हवं असतं. याचं कारण म्हणजे कुवैती दीनार हे जगातील सर्वात मौल्यवान चलन मानलं जातं. अनेक भारतीय कुटुंबांचा उदरनिर्वाह कुवैतमधून येणाऱ्या पैशांवर चालतो. कारण अनेक भारतीय लोक हे कुवैतमध्ये काम करण्यासाठी गेले आहेत.
advertisement
मात्र, गेल्या सात दिवसांपासून मध्य पूर्वेतील (Middle East) वातावरण कमालीचं तापलं आहे. अमेरिका आणि इस्रायलच्या फौजांनी इराणवर हल्ले सुरू केले आहेत आणि इराणनेही आता बहरीन, कतार, आणि कुवैत सारख्या देशांमधील अमेरिकन सैन्य तळांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. या सगळ्यात अनेकांच्या मनात एक प्रश्न आला असेल की अरे कुवेत सारखा देश भारताच्या तुलनेत किती पुढे असेल? तेथिल चलनाची किंमत किती कमी किंवा जास्त असेल? चला याबद्दल सविस्तर जाणून घेऊ.
advertisement
सौदी अरेबिया आणि इराकच्या मध्ये वसलेला कुवैत हा एक छोटा पण प्रचंड श्रीमंत देश आहे. 1961 मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यापासून या देशाने तेलाच्या जोरावर प्रगतीची शिखरं गाठली आहेत. जगातील सातवा सर्वात मोठा तेलसाठा या देशाकडे आहे. कुवैत सिटी ही या देशाची राजधानी असून ती कला आणि व्यापाराचे प्रमुख केंद्र आहे.
advertisement
advertisement
advertisement
युद्धाचा भडका आणि वाढता तणावगेल्या आठवडाभरापासून अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षामुळे कुवैतमध्येही भीतीचे वातावरण आहे. इराणने कुवैतमधील त्या भागांना लक्ष्य केले आहे जिथे अमेरिकन सैन्य तैनात आहे. यामुळे आखाती देशांमधील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कुवैतची हवामान स्थिती सध्या उष्ण वाळवंटी असली तरी, राजकीय वातावरण त्यापेक्षाही जास्त तापलेले दिसत आहे.
advertisement
कुवैतला जाणाऱ्यांनी काय काळजी घ्यावी?जर तुम्ही नोकरी किंवा पर्यटनासाठी कुवैतला जाण्याचा विचार करत असाल, तर सध्याची परिस्थिती पाहता सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे:प्रवासापूर्वी भारतीय दूतावासाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचना (Advisory) नक्की तपासा.युद्धाच्या काळात चलनाच्या दरात मोठी चढ-उतार होऊ शकते, त्यामुळे ट्रॅव्हल कार्ड किंवा रोकड घेताना दराची खात्री करा.सध्याच्या तणावपूर्ण स्थितीमुळे तिथे जाण्यापूर्वी स्थानिक बातम्या आणि घडामोडींचा अंदाज घेणे केव्हाही चांगले.
advertisement







