UPSC निकाल जाहीर, अनुज अग्निहोत्री देशात प्रथम; महाराष्ट्रातील किती जणांना यश, संपूर्ण निकाल पाहा
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Union Public Service Commission (UPSC) ने सिव्हिल सर्व्हिस परीक्षा 2025 चा अंतिम निकाल जाहीर केला असून अनुज अग्निहोत्री यांनी देशात अव्वल क्रमांक पटकावला आहे. तर राजेश्वरी सुवे एम यांनी दुसरा क्रमांक मिळवत या प्रतिष्ठेच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
नवी दिल्ली: Union Public Service Commission (UPSC) ने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या 2025 अंतिम निकाल जाहीर केला आहे. देशातील सर्वात कठीण आणि प्रतिष्ठेच्या स्पर्धा परीक्षांपैकी एक मानल्या जाणाऱ्या या परीक्षेत अनुज अग्निहोत्री यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे, तर राजेश्वरी सुवे एम यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. उमेदवारांना आपला निकाल आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येणार आहे.
UPSC चा अंतिम निकाल upsc.gov.in या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आला आहे. उमेदवारांनी वेबसाइटवरील Result विभागात जाऊन उपलब्ध असलेली PDF फाईल डाउनलोड करावी आणि त्यामध्ये CTRL+F चा वापर करून आपले नाव किंवा रोल नंबर शोधून निकाल तपासता येईल. (संपूर्ण निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा)
UPSC सिव्हिल सर्व्हिस परीक्षा ही भारतीय लोकशाहीतील सर्वात कठीण आणि प्रतिष्ठेची परीक्षा मानली जाते. या परीक्षेत यश मिळवणारे उमेदवार पुढे IAS, IPS, IFS यांसारख्या महत्त्वाच्या प्रशासकीय सेवांमध्ये नियुक्त होतात. दरवर्षी लाखो उमेदवार या परीक्षेसाठी अर्ज करतात; मात्र अंतिम यादीत अत्यंत मर्यादित उमेदवारांची निवड होते.
advertisement
यंदाच्या वर्षी UPSC सिव्हिल सर्व्हिस परीक्षेच्या मुलाखती (इंटरव्ह्यू) 27 फेब्रुवारी 2026 रोजी पूर्ण झाल्या होत्या. UPSC चा पूर्वीचा ट्रेंड पाहता, मुलाखती संपल्यानंतर साधारणपणे 4 ते 6 दिवसांत अंतिम निकाल जाहीर केला जातो. त्यानुसार यंदाही आयोगाने त्याच कालावधीत निकाल जाहीर करत उमेदवारांची प्रतीक्षा संपवली आहे.
आता अंतिम यादीतील यशस्वी उमेदवारांना त्यांच्या गुणवत्तेनुसार विविध केंद्रीय सेवांमध्ये नियुक्ती मिळणार असून, पुढील काही महिन्यांत त्यांचे प्रशिक्षण सुरू होण्याची शक्यता आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 06, 2026 3:07 PM IST
मराठी बातम्या/देश/
UPSC निकाल जाहीर, अनुज अग्निहोत्री देशात प्रथम; महाराष्ट्रातील किती जणांना यश, संपूर्ण निकाल पाहा









