"लोकांना वाटतं माझ्याकडे गाड्या नाहीत", 'वाईट वेळ सुरू झाली' म्हणणाऱ्यांना गोविंदाच सणसणीत उत्तर, 'त्या' VIDEOचं सत्य समोर आणलं
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Govinda News: उत्तर प्रदेशातील एका शालेय कार्यक्रमात डान्स करतानाचा गोविंदाचा व्हिडिओ पाहून काहींनी त्याला हिणवलं. या ट्रोलिंगवर आता स्वतः गोविंदाने मौन सोडलं असून सडेतोड उत्तर दिलं आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
आग्रा दौऱ्यात गोविंदा साध्या आणि स्वस्त गाड्यांमधून प्रवास करताना दिसला होता, ज्यामुळे त्याच्या आर्थिक स्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. यावर हसत गोविंदाने उत्तर दिलं, "लोकांना वाटतं माझ्याकडे गाड्या नाहीत, पण सत्य हे आहे की तिथल्या प्रोटोकॉलनुसार आलिशान मर्सिडीज गाड्यांना आत जाण्याची परवानगी नसते. सुरक्षा नियमांमुळे आम्हाला तिथल्या स्थानिक गाड्यांचाच वापर करावा लागला. कामासाठी मी कधीही इगो आड आणत नाही. काम हे काम असतं, मग ते साध्या गाडीतून असो किंवा विमानातून."
advertisement
जेव्हा सोशल मीडियावर गोविंदाच्या वाईट दिवसांची चर्चा सुरू होती, तेव्हाची एक आठवण त्याने सांगितली. तो म्हणाला, "मी जेव्हा विमानातून प्रवास करत होतो, तेव्हा सहप्रवाशांनी माझं गाणं गाऊन माझं स्वागत केलं. मला देवाने आणि माझ्या चाहत्यांनी इतकं काही दिलं आहे की, मी सदैव त्यांचा ऋणी राहीन. मला कोणासमोरही सिद्ध करायची गरज नाही की मी किती सुखी आहे."
advertisement








