Petrol : 1 लिटर पेट्रोलची किंमत फक्त 3 रुपये! चॉकलेटपेक्षाही स्वस्त इंधन मिळणारे 'हे' आहेत जगातील देश; भारताचा नंबर कितवा?
- Published by:Devika Shinde
Last Updated:
तुम्ही अशी कल्पना करा की, तुम्ही पेट्रोल पंपावर गेलात आणि एक लिटर पेट्रोलसाठी तुम्हाला एखाद्या चॉकलेट किंवा माचिसच्या पेटी इतकेच पैसे द्यावे लागले तर? ऐकायला हे स्वप्न वाटत असलं तरी जगाच्या पाठीवर असे काही देश आहेत, जिथे पेट्रोल अक्षरशः पाण्याच्या दरात मिळतं.
सकाळी उठल्यावर आपण सर्वात आधी मोबाईलवर काय चेक करतो? तर आजचे 'पेट्रोल-डिझेलचे दर' (Petrol-Diesel Rates). रुपया-दोन रुपयांनी जरी दर वाढले तरी सामान्यांच्या बजेटचं गणित कोलमडतं. सध्या भारतात अनेक शहरांत पेट्रोल 100 रुपयांच्या आसपास आहे. पेट्रोल पंपावर गेल्यावर जेव्हा आपण मीटरकडे पाहतो, तेव्हा खिसा रिकामा होत असल्याची जाणीव प्रकर्षाने होते.
advertisement
पण, तुम्ही अशी कल्पना करा की, तुम्ही पेट्रोल पंपावर गेलात आणि एक लिटर पेट्रोलसाठी तुम्हाला एखाद्या चॉकलेट किंवा माचिसच्या पेटी इतकेच पैसे द्यावे लागले तर? ऐकायला हे स्वप्न वाटत असलं तरी जगाच्या पाठीवर असे काही देश आहेत, जिथे पेट्रोल अक्षरशः पाण्याच्या दरात मिळतं. खाडी देशांपासून ते आफ्रिकेपर्यंत पेट्रोलच्या किमतींचं हे 'स्वस्त' गणित नेमकं काय आहे? चला सविस्तर जाणून घेऊया.
advertisement
1. इराण: जगातील सर्वात स्वस्त पेट्रोलचं 'नंदनवन'सध्या संपूर्ण जगात सर्वात स्वस्त पेट्रोल देणाऱ्या देशांच्या यादीत इराण अव्वल स्थानी आहे. इराणमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत केवळ 2.50 ते 3 रुपये इतकी आहे. कारण इराण सरकार आपल्या नागरिकांना इंधनावर प्रचंड मोठी सबसिडी (अनुदान) देते.इतकं स्वस्त पेट्रोल असल्यामुळे तिथे शेजारील देशांमध्ये इंधनाची तस्करी वाढली आहे. हे रोखण्यासाठी आता तिथे 'कोटा सिस्टम' लागू करण्यात आली आहे.
advertisement
2. लिबिया आणि वेनेजुएला: चॉकलेटच्या किमतीत पेट्रोलउत्तर आफ्रिकेतील लिबिया यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे, तिथे पेट्रोलचा दर साधारण 2.54 रुपये लिटर आहे. एकेकाळी वेनेजुएला या बाबतीत जगात नंबर 1 वर होता, पण आता तिथे किमती थोड्या वाढून 3 रुपयांच्या आसपास गेल्या आहेत. वेनेजुएलामध्येही आता ठराविक लिटरनंतर सबसिडी बंद होऊन दर वाढवले जातात.
advertisement
advertisement
advertisement
4. भारत आणि शेजारील देशांची तुलनाग्लोबल लिस्टमध्ये भारताचा क्रमांक 73 वा लागतो. भारतात राज्यानुसार पेट्रोलचे दर 95 ते 105 रुपयांच्या दरम्यान आहेत. आपल्या शेजारील देशांशी तुलना केली तर:पाकिस्तान: तिथे पेट्रोल साधारण 80 ते 84 रुपये लिटर आहे (जागतिक यादीत 36 वा क्रमांक).अँगोला (आफ्रिका): इथेही पेट्रोल स्वस्त असून दर साधारण 27 रुपये लिटर आहे.
advertisement
इतका मोठा फरक का असतो?पेट्रोलच्या दरातील या तफावतीची दोन मुख्य कारणं आहेत:1. स्वतःचे उत्पादन: ज्या देशांकडे तेलाचे स्वतःचे साठे आहेत आणि जे स्वतः उत्पादन करतात, तिथे खर्च कमी येतो. भारत आपल्या गरजेच्या 80% पेक्षा जास्त तेल आयात करतो.टॅक्स स्ट्रक्चर: भारतात पेट्रोलवर केंद्र आणि राज्य सरकारचे विविध कर (Tax) लावले जातात, ज्यामुळे किमती वाढतात. याउलट खाडी देश आपल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी कर लावत नाहीत किंवा सबसिडी देतात.
advertisement
स्वस्त पेट्रोल असलेल्या देशांमध्ये राहण्याचे जितके फायदे आहेत, तितकेच अर्थव्यवस्थेवर त्याचे ताणही असतात. भारतात दर जास्त असले तरी पायाभूत सुविधा आणि इतर विकासकामांसाठी त्यातून मिळणारा महसूल महत्त्वाचा ठरतो. पण तरीही, 3 रुपये लिटर पेट्रोलची कल्पना भारतीयांसाठी मात्र नेहमीच सुखद धक्का देणारी असेल.






