advertisement

फडणवीस सरकारने तिजोरी उघडली! पुणेकरांवर घोषणाचा पाऊस, काय काय मिळालं पुण्याला?

Last Updated:

पुणेकरांसाठी सर्वात मोठा दिलासा म्हणजे पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला अधिकृत मान्यता मिळाली आहे.

News18
News18
मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सादर केलेल्या अर्थसंकल्पात पुणे जिल्ह्यासाठी विकासाचा महामार्ग खुला केला आहे. पुणे शहराचा विस्तार, वाहतूक कोंडीवर जालीम उपाय आणि औद्योगिक प्रगतीसाठी हजारो कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. मुंबई आणि पुण्याला मिळून  50 अब्ज डॉलर्सचे जागतिक केंद्र बनवण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट या अर्थसंकल्पातून समोर आले आहे.
पुणेकरांसाठी सर्वात मोठा दिलासा म्हणजे पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला अधिकृत मान्यता मिळाली आहे. यामध्ये 'खडकवासला-स्वारगेट-हडपसर-खराडी' या महत्त्वाच्या मार्गाचा समावेश आहे. तसेच, तळेगाव ते चाकण' या औद्योगिक पट्ट्यासाठी उन्नत (Elevated) मेट्रो मार्गालाही हिरवा कंदील मिळाला आहे. रेल्वे प्रवाशांसाठी पुणे-लोणावळा तिसऱ्या रेल्वेमार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू असून 'येरवडा ते कात्रज' आणि 'हिंजवडी ते सिंहगड रस्ता' या मार्गांच्या आराखड्याचे कामही प्रगतीपथावर आहे. लवकरच पूर्ण होणार आहे.
advertisement

विमानतळ आणि महामार्गांना गती

पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सरकारने 'विशेष प्राधिकरणाची' (Special Authority) स्थापना केली आहे. यामुळे जमिनीचे संपादन आणि प्रत्यक्ष कामाला वेग येणार आहे. तसेच, बारामतीमध्ये 'नाईट लँडिंग'ची सुविधा उपलब्ध करून दिल्याने विमानवाहतुकीला मोठी चालना मिळणार आहे. रस्ते वाहतुकीसाठी 'शिरूर ते छत्रपती संभाजीनगर' या ग्रीनफिल्ड महामार्गाला मान्यता देऊन पुणे-मराठवाडा कनेक्टिव्हिटी अधिक सुलभ करण्यात आली आहे.
advertisement

जागतिक 'गेमिंग' आणि 'GCC' हब

तंत्रज्ञान क्षेत्रात पुण्याला जागतिक स्तरावर नेण्यासाठी सरकार सज्ज आहे. महाराष्ट्रात 295 हून अधिक गेमिंग स्टुडिओ उभारण्याचे आणि 'AVGC' धोरणांतर्गत स्टार्टअपला प्रोत्साहन देण्याचे जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये पुण्याला सर्वाधिक पसंती मिळत असून चार लाख उच्च कुशल रोजगार निर्मितीचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. खंडाळा येथे जागतिक दर्जाच्या 'इनोव्हेटिव्ह केंद्रा'साठी 130 कोटींचा निधी राखून ठेवण्यात आला आहे.
advertisement

शेती आणि जलसंपदा

बारामती आणि पुरंदर तालुक्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला 'नीरा-कऱ्हा' नदी जोड प्रकल्प राबवण्याची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे या भागातील पाण्याचा प्रश्न कायमचा सुटण्यास मदत होईल. मुंबई-पुणे हायस्पीड ट्रेनमुळे उत्पन्नात मोठी वाढ होण्याची शक्यताही अर्थसंकल्पात वर्तवण्यात आली आहे.
advertisement
view comments
मराठी बातम्या/पुणे/
फडणवीस सरकारने तिजोरी उघडली! पुणेकरांवर घोषणाचा पाऊस, काय काय मिळालं पुण्याला?
Next Article
advertisement
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार, कोणालाच माहिती नाही भारताचा 'बॅकअप प्लॅन'
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार
  • पेट्रोल-डिझेलच्या साठ्याबाबत मोठी अपडेट

  • जाणून घ्या किती दिवस पुरेल तेलसाठा

  • भारताचे 'ऑईल सिक्रेट' पहिल्यांदाच कळाले

View All
advertisement