advertisement

Oscar 2026 च्या मंचावर चमकणार प्रियांका चोप्रा, प्रेझेंटर बनून 'देसी गर्ल' वाढणार भारताची शान; म्हणजे नेमकं करणार काय?

Last Updated:

गेल्या काही काळापासून जागतिक स्तरावर काम करणारी प्रियांका चोप्रा पुन्हा एकदा ऑस्करच्या मंचावर चमकणार आहे.

News18
News18
बॉलिवूडची 'देसी गर्ल' प्रियांका चोप्रा जोनासने आता हॉलिवूडमध्ये स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. प्रियांका चोप्रानं भारताचं नाव आता ऑस्करपर्यंत पोहोचवलं आहे. 98 व्या अकादमी पुरस्कारांमध्ये प्रियांका चोप्रा सादरकर्ती असणार आहे. ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. प्रियांकाने स्वतः सोशल मीडियाद्वारे ही माहिती चाहत्यांना दिली आहे. गेल्या काही काळापासून जागतिक स्तरावर काम करणारी प्रियांका चोप्रा पुन्हा एकदा ऑस्करच्या मंचावर चमकणार आहे.
प्रियांका चोप्राने शुक्रवारी तिच्या इंस्टाग्राम हँडलवर एक पोस्ट पोस्ट केली. ज्यामध्ये तिचे नाव आणि सादरकर्त्यांची नावे समाविष्ट आहेत. "2026 अकादमी पुरस्कार", असं कॅप्शन देत प्रियांकाने पोस्टर शेअर केलं आहे. प्रियांकासोबत, यादीत रॉबर्ट डाउनी ज्युनियर, अ‍ॅन हॅथवे, विल अर्नेट, ग्वेनेथ पॅल्ट्रो आणि पॉल मेस्कल सारखी मोठी नावे आहेत. हे स्टार समारंभात व्यासपीठावर येतील आणि विविध श्रेणींमध्ये प्रतिष्ठित पुरस्कार विजेत्यांचा सन्मान करतील. म्हणजेच प्रियांका चोप्राच्या हस्ते विविध श्रोणींमधील विजेत्यांना बक्षीस देण्यात येणार आहे.
advertisement
पोस्टनंतर प्रियांकाचं प्रचंड कौतुक करण्यात आलं आहे. चाहत्यांनी आणि कलाकार मित्रांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.  प्रसिद्ध स्टँड-अप कॉमेडियन झाकीर खान यांनी कमेंट करत लिहिलंय,"अभिनंदन. तुम्ही खरोखरच एक हिरो आहात."
advertisement












View this post on Instagram























A post shared by Priyanka (@priyankachopra)



advertisement
अकादमी पुरस्कार हे चित्रपटातील कलात्मक आणि तांत्रिक उत्कृष्टतेसाठी जगातील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार आहेत. ते अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस द्वारे प्रदान केले जातात. ही लॉस एंजेलिसमधील एक व्यावसायिक मानद संस्था आहे जी सिनेमॅटिक कामगिरीतील उत्कृष्टतेला मान्यता देते. हे सन्मान दरवर्षी चित्रपट उद्योगातील उत्कृष्ट दिग्दर्शक, अभिनेते आणि लेखकांना दिले जातात. 1929 मध्ये पहिल्यांदा स्थापन झालेले हे पुरस्कार मनोरंजन उद्योगातील सर्वात जुन्या आणि सर्वात प्रतिष्ठित कार्यक्रमांपैकी एक आहेत.
advertisement
प्रियांका चोप्राच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झाल्यास, ती लवकरच वाराणसी सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एसएस राजामौली यांच्या वाराणसी चित्रपटात महेश बाबू आणि पृथ्वीराज सुकुमारन देखील आहेत. या चित्रपटात प्रियांका सात भारतीय सिनेमात काम करतेय. ती महेश बाबूसोबत स्क्रीन शेअर करताना दिसेल.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
Oscar 2026 च्या मंचावर चमकणार प्रियांका चोप्रा, प्रेझेंटर बनून 'देसी गर्ल' वाढणार भारताची शान; म्हणजे नेमकं करणार काय?
Next Article
advertisement
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार, कोणालाच माहिती नाही भारताचा 'बॅकअप प्लॅन'
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार
  • पेट्रोल-डिझेलच्या साठ्याबाबत मोठी अपडेट

  • जाणून घ्या किती दिवस पुरेल तेलसाठा

  • भारताचे 'ऑईल सिक्रेट' पहिल्यांदाच कळाले

View All
advertisement