जे कुणाला जमलं नाही, ते इराणने करून दाखवलं, सर्वात अवघड चक्रव्यूह भेदल, अमेरिका-इस्रायल हादरलं
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
इराणने 'ऑपरेशन ट्रू प्रॉमिस ४' अंतर्गत इस्रायलवर हल्ला केला. 'खोर्रमशहर-४' मिसाइलने इस्रायलच्या 'आयरन डोम'ला चकवा दिला. अमेरिकेच्या तळांवरही हल्ला झाला. इराणचा लष्करी विजय.
जगातील सर्वात प्रगत तंत्रज्ञान, अमेरिकेची साथ आणि ७ पदरी अभेद्य सुरक्षा कवच... ज्या इस्रायलच्या दिशेनं पाहायची कुणाची हिंमत होत नव्हती, त्या इस्रायलचं अभेद्य चक्रव्यूह इराणने आज पहाटे चक्काचूर करून दाखवलं. 'ऑपरेशन ट्रू प्रॉमिस ४' अंतर्गत इराणने डागलेल्या क्षेपणास्त्रांनी केवळ इस्रायलच्या जमिनीलाच नाही, तर त्यांच्या 'सुपरपॉवर' असण्याच्या गर्वालाही तडा दिला.
advertisement
advertisement
ताशी १९ हजार किलोमीटरपेक्षा जास्त वेगाने आलेल्या या क्षेपणास्त्रांनी इस्रायलच्या रडारला चकवा दिला आणि थेट 'बेंजामिन नेतान्याहू' यांच्या सत्ताकेंद्रावर म्हणजेच तेल अवीवच्या काळजावरच वार केला. इराणने हा हल्ला केवळ ताकदीने नाही, तर बुद्धीनं केला. त्यांनी एकाच वेळी शेकडो ड्रोन सोडले, जेणेकरून इस्रायलची यंत्रणा त्या ड्रोनला पाडण्यात गुंतून राहील.
advertisement
advertisement
advertisement
अमेरिकेसारख्या महासत्तेला आपल्या सैनिकांच्या रक्षणासाठी 'मानवी ढाल' वापरावी लागणं, हा इराणचा मोठा राजनैतिक आणि लष्करी विजय मानला जात आहे. ध्वनीपेक्षा कित्येक पटीने जास्त वेगाने प्रवास करण्याची क्षमता. २००० किमी दूर असूनही केवळ ३० मीटरच्या फरकाने अचूक टार्गेट उडवण्याची ताकद. एकाच वेळी ८० वेगवेगळ्या लक्ष्यांवर मारा करण्याची क्षमता.
advertisement








