advertisement

ब्रेकअपनंतर विवाहित मैत्रिणीवर जडला जीव, तिच्या मुलाला दत्तक घेत केलं लग्न; 40 वर्षांचा सुखी संसार, हा अभिनेता कोण?

Last Updated:

फोटोमध्ये हसणारा हा अभिनेता आजही तितकाच गोड हसतो. नेहमी पॉझिटिव्ह राहणाऱ्या या अभिनेत्याची लव्ह स्टोरी तुम्हाला भावुक करेल.

News18
News18
फोटोमध्ये डाव्या कोपऱ्यात दिसणारा मुलगा आज बॉलिवूडचा मोठा अभिनेता आहे. अनेक सिनेमा, नाटकांत त्याने काम केलं आहे. कधी हिरो, व्हिलन, वडिल, प्रियकर अशा अनेक भूमिका त्याने साकारल्या आहेत. वयाच्या सत्तरीतही अभिनेता अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे. आजवर त्याने अनेक पुरस्कार देखील आपल्या नावे केलेत. पण या अभिनेत्याच्या खऱ्या आयुष्याची गोष्ट एखाद्या फिल्मच्या स्टोरीपेक्षा कमी नाही.
फोटोमध्ये हसणारा हा अभिनेता आजही तितकाच गोड हसतो. नेहमी पॉझिटिव्ह राहणाऱ्या या अभिनेत्याची लव्ह स्टोरी तुम्हाला भावुक करेल. त्याने जिच्यावर प्रेम केलं ती त्याला सोडून गेली. नशिबाच्या पुढ्यात कोणाचं काही चालत नाही असं म्हणतात ते खरं. अभिनेत्याचं लग्न त्याच्या कॉलेजमधील सीरियशी झालं. आधीच विवाहित आणि एका मुलाची आई असलेल्या अभिनेत्रीशी त्यानं लग्न केलं. अभिनेत्याचा आज चाळीसहून अधिक वर्षांचा सुखाचा संसार आहे.
advertisement
आपण बोलत आहोत तो अभिनेता म्हणेजच अनुपम खेर. अनुपम खेर आणि किरण खेर हे बॉलिवूडमधील सर्वात प्रिय जोडप्यांपैकी एक आहेत. त्यांच्या लग्नाला जवळजवळ 40 वर्षे झाली आहेत.  त्यांची मैत्री चंदीगडमधील कॉलेजमध्ये असताना सुरू झाली आणि मुंबईत पुन्हा भेटल्यानंतर ते प्रेमात पडले.  किरण खेर या अनुपम खेर यांच्या प्रेमात पडल्या तेव्हा त्या आधीच विवाहित आणि एका मुलाची आई होत्या.
advertisement
अनुपम खेर त्या दिवसांची आठवण करून देत एका मुलाखतीत म्हणाले, "मी लग्न केलेले नव्हते. किरण विवाहित होती आणि आम्ही 12 वर्षे जिवलग मित्र होतो. ती कॉलेजमध्ये माझी सिनियर होती. ती एक स्टार होती. ती तिच्या वर्गातील नंबर वन अभिनेत्री आणि भारतीय स्तरावरील बॅडमिंटन खेळाडू होती. मी मुंबईत राहायला गेलो आणि लग्नानंतर ती गौतम बेरीसोबत मुंबईत राहायला आली.  माझ्या संघर्षाच्या दिवसांत सतीश कौशिक आणि मी अनेकदा किरण आणि गौतमच्या घरी जेवायला जायचो. ती आम्हाला टॅक्सीसाठी 50 रुपये द्यायची पण आम्ही ते पैसे वाचवून बसने प्रवास करायचो."
advertisement
अनुपम यांनी सांगितलं की, "जेव्हा ती तिच्या लग्नात कठीण काळातून जात होती आणि मी वाईट नात्यात होतो. तेव्हा मी ज्या मुलीसोबत होतो ती मला सोडून गेली. तेव्हा किरण आणि मी प्रेमात पडलो आणि लग्न केले."
किरण आणि अनुपम खेर यांनी 1985 मध्ये लग्न केलं. हे किरण यांचं दुसरं लग्न होतं.  लग्नानंतर अनुपम यांनी किरण खेर यांचा मुलगा सिकंदर याला दत्तक घेतलं आणि त्याला आपलं आडनाव दिलं.  किरण यांना  घटस्फोट दिल्यानंतर त्यांचा पहिला नवरा गौतमने नंदिनी सेनशी लग्न केलं.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
ब्रेकअपनंतर विवाहित मैत्रिणीवर जडला जीव, तिच्या मुलाला दत्तक घेत केलं लग्न; 40 वर्षांचा सुखी संसार, हा अभिनेता कोण?
Next Article
advertisement
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार, कोणालाच माहिती नाही भारताचा 'बॅकअप प्लॅन'
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार
  • पेट्रोल-डिझेलच्या साठ्याबाबत मोठी अपडेट

  • जाणून घ्या किती दिवस पुरेल तेलसाठा

  • भारताचे 'ऑईल सिक्रेट' पहिल्यांदाच कळाले

View All
advertisement