वर्ल्डकप फायनलमध्ये नवा वाद, हार्दिक पांड्याच्या अडचणी वाढल्या, तक्रार दाखल
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
भारतीय क्रिकेट संघाने आयसीसी मेन्स टी-२० वर्ल्ड कप जिंकल्यानंतर देशभरात आनंदाचं वातावरण आहे. मात्र, याच दरम्यान भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या एका नव्या वादात अडकला आहे.
पुणे: भारतीय क्रिकेट संघाने आयसीसी मेन्स टी-२० वर्ल्ड कप जिंकल्यानंतर देशभरात आनंदाचं वातावरण आहे. मात्र, याच दरम्यान भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या एका नव्या वादात अडकला आहे. फायनल सामन्याच्या दिवशी केलेल्या चुकीमुळे त्याच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पुण्याची शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हा तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे.
नेमकं प्रकरण काय?
टी-२० विश्वचषक विजयाचा जल्लोष सुरू असताना सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये हार्दिक पांड्या भारतीय राष्ट्रध्वज (तिरंगा) हाताळत असताना त्याने अयोग्य वर्तन केल्याचा दावा एका वकिलाने केला आहे. या व्हिडिओच्या पार्श्वभूमीवर नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट असून हार्दिकवर टीका केली जात आहे.
वकिलाचा आक्रमक पवित्रा
advertisement
या प्रकरणी अॅडव्होकेट वाजेद खान यांनी पुढाकार घेत हार्दिक पांड्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची तयारी दर्शवली आहे. त्यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात या संदर्भात लेखी तक्रार अर्ज सादर केला आहे. वाजेद खान यांनी आपली भूमिका मांडताना म्हटले की, "भारतीय राष्ट्रध्वजाचा सन्मान राखणं हे प्रत्येक भारतीय नागरिकाचं आद्य कर्तव्य आहे. खेळाडू कितीही मोठा असला तरी तो राष्ट्रध्वजापेक्षा मोठा नाही. ध्वजाचा अवमान सहन केला जाणार नाही."
advertisement
सोशल मीडियावर चर्चांना उधाण
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्या आणि त्याच्या प्रेयसीचे अनेक व्हिडीओज व्हायरल झाले आहेत. यातील एका व्हिडीओत हार्दिक पांड्या प्रेयसीसोबत जल्लोष करत आहे. मात्र यावेळी त्याने राष्ट्रध्वजाची विटंबना केल्याचा आरोप करण्यात आला आहे. विजयाच्या जल्लोषात राष्ट्रध्वजाची विटंबना झाली की नाही, यावर पोलीस आता काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Mar 11, 2026 8:02 AM IST









