advertisement

Astrology: महिनाभर अग्नीपासून जपा, विषबाधेचा धोका; सूर्याच्या मीन संक्रातीनंतर 5 राशीच्या लोकांना अलर्ट

Last Updated:
Surya Gochar March 2026 negative effects: 15 मार्च 2026 रोजी सूर्यदेवाचे राशी परिवर्तन होत असून सूर्य उत्तर रात्री 01:08 वाजता मीन राशीत प्रवेश करेल. 14 एप्रिल रोजी सकाळी 09:38 वाजेपर्यंत सूर्य या राशीत राहील. या गोचरच्या वेळी 5 शुभ संयोग जुळून येत असले तरी 5 राशींच्या व्यक्तींनी विशेष सावध राहणे गरजेचे आहे. मीन संक्रातीचा काही राशींवर नकारात्मक परिणाम करिअर, आरोग्य आणि वैवाहिक आयुष्यावर होऊ शकतो.
1/6
सूर्य गोचरच्या वेळी जुळून आलेले 5 शुभ संयोग - सूर्य गोचरच्या दिवशीच पापमोचनी एकादशी आहे. हे व्रत केल्याने सर्व पापांतून मुक्ती मिळते अशी धार्मिक मान्यता आहे. या दिवशी मीन संक्रांती साजरी केली जाईल. संक्रांतीच्या दिवशी स्नान आणि दानाला विशेष पुण्य मानले जाते. द्विपुष्कर योग 15 मार्च रोजी हा योग जुळून येत आहे. या योगात केलेल्या शुभ कार्याचे फळ दुप्पट मिळते. सकाळी 10:25 पर्यंत परिघ योग असेल. हा योग शत्रूंवर विजय मिळवण्यासाठी केलेल्या उपायांसाठी उत्तम मानला जातो. सकाळी 10:25 नंतर दिवसभर शिव योग असेल. हा योग पूजा, साधना आणि योगाभ्यासासाठी अत्यंत फलदायी असतो.

2/6
मेष राशीसाठी हा काळ थोडा खर्चिक आणि कठीण असू शकतो. विनाकारण कोणाशी वाद घालू नका. आरोग्याची काळजी घ्या, विशेषतः डाव्या डोळ्याच्या तक्रारी जाणवू शकतात. शरीरात कॅल्शियमची कमतरता भासू देऊ नका. कोणतेही कायदेशीर वाद कोर्टाबाहेरच मिटवणे हिताचे ठरेल. विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळवण्यासाठी अधिक कष्ट करावे लागतील.

3/6
सूर्य हा सिंह राशीचा स्वामी असल्याने हा गोचर संमिश्र परिणाम देईल. आई-वडिलांशी संबंध खराब होणार नाहीत याची काळजी घ्या. जर तुम्ही सरकारी निविदा (टेंडर) भरण्याच्या विचारात असाल, तर हा काळ अनुकूल आहे. कामाच्या ठिकाणी होणाऱ्या राजकारणापासून दूर राहा. वादविवाद टाळून आपले काम संपवून थेट घरी येणे चांगले राहील. चढ-उतारांनंतरही समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल.

4/6
सूर्याचे सप्तम भावातून होणारे संक्रमण वैवाहिक जीवनात चढ-उतार आणू शकते. तुमच्या शांत स्वभावामुळे तुम्ही परिस्थिती हाताळू शकाल, तरीही कौटुंबिक कलहामुळे मन अस्वस्थ राहू शकते. लग्नाच्या बोलणीत थोडा विलंब होण्याची शक्यता आहे. मात्र, सरकारी कामांमध्ये यश मिळेल. नवीन नोकरीसाठी अर्ज करण्यास हा काळ उत्तम आहे.

5/6
कुटुंबात कलह आणि मानसिक तणाव वाढण्याची शक्यता आहे. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. मित्र किंवा नातेवाईकांकडून एखादी वाईट बातमी मिळू शकते. प्रवासात सावध राहा आणि स्वतःच्या वस्तूंची चोरी होणार नाही याची काळजी घ्या. कोर्टातील प्रकरणे बाहेरच मिटवणे शहाणपणाचे ठरेल. पूर्वजांच्या मालमत्तेचे प्रश्न मार्गी लागतील.

6/6
कुंभ राशीसाठी हे गोचर ठीक राहील, पण आरोग्याबाबत हलगर्जीपणा करू नका. उजव्या डोळ्याच्या तक्रारींकडे लक्ष द्या. अग्नी, विष किंवा चुकीच्या औषधांपासून सावध राहण्याचा सल्ला दिला जातो. घरातील लोकांमध्ये काही कारणास्तव मतभेद होऊ शकतात. तुमचे जवळचे लोकच तुम्हाला त्रास देऊ शकतात, त्यामुळे सावध राहा. विद्यार्थ्यांना यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)

Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement