advertisement

पाण्याची टाकी, हंडा सगळं भरून ठेवा, पनवेलला 36 तास थेंबही येणार नाही, कधी आणि कुठं? पाहा सविस्तर

Last Updated:

Panvel Water Supply: लोकसंख्या वाढीमुळे पनवेलची पाण्याची गरज देखील वाढली आहे. त्यामुळे न्हावा-शेवा पाणीपुरवठा योजनेत सुधारणा करण्यात येत आहेत.

पाण्याची टाकी, हंडा, घागर सगळं भरून ठेवा, पनवेलला 36 तास थेंबही येणार नाही, कधी आणि कुठं? पाहा सविस्तर
पाण्याची टाकी, हंडा, घागर सगळं भरून ठेवा, पनवेलला 36 तास थेंबही येणार नाही, कधी आणि कुठं? पाहा सविस्तर
पनवेल: पनवेलकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. न्हावा-शेवा उपप्रादेशिक पाणीपुरवठा योजनेअंतर्गत दुरुस्तीकामे आणि नवीन जलवाहिनी कार्यान्वित करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे गुरुवारी, 12 मार्च रोजी सकाळी 9 वाजल्यापासून ते शुक्रवारी 13 मार्च रात्री 9 वाजेपर्यंत तब्बल ३६ तास पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. या काळात पनवेल शहरासह सिडको वसाहती आणि आसपासच्या गावांतील नागरिकांना पाणीबाणीच्या स्थितीचा सामना करावा लागेल. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा साठा करून जपून वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
लोकसंख्या वाढीमुळे पनवेलची पाण्याची गरज देखील वाढली आहे. त्यामुळे न्हावा-शेवा पाणीपुरवठा योजनेत सुधारणा करण्यात येत आहेत. भोकरपाडा येथील जलशुद्धीकरण केंद्रात विद्युत आणि स्थापत्य दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत. तसेच वाढीव न्हावा-शेवा पाणीपुरवठा योजना टप्पा-3 अंतर्गत टाकण्यात आलेली जलवाहिनी देखील कार्यान्वित केली जाणार आहे.
advertisement
या भागासाठी जलवाहिनी
भोकरपाडा ते ठोंबरेवाडी येथील वाधवा सिटी, गाढी नदी परिसर तसेच विसपुते कॉलेज परिसरात जलवाहिनी कार्यान्वित करण्याचे काम करण्यात येईल. त्यामुळे या भागातील एमजेपीच्या न्हावा-शेवा केंद्रातून होणारा सर्व ग्राहकांचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील.
या भागात पाणीपुरवठा बंद
सिडकोच्या कळंबोली, नवीन पनवेल, पनवेल शहर, खांदेश्वर, करंजाडे आणि नावडे या भागांवर शटडाउनचा परिणाम होईल. तसेच करंजाडे, डेरीवली, वडघर, विचुंबे, उसर्ली, बेलवली - बारदोली आणि नांदगाव-कुडावे या गावांचा पाणीपुरवठा बंद राहील.
advertisement
दरम्यान, पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने सिडको प्रशासनाने नागरिकांना पाण्याचा आवश्यक साठा करून ठेवण्याचे तसेच पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
पाण्याची टाकी, हंडा सगळं भरून ठेवा, पनवेलला 36 तास थेंबही येणार नाही, कधी आणि कुठं? पाहा सविस्तर
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement