Ajit Pawar: आता 'अजितदादा' नाव वापरण्यापूर्वी शंभर वेळा विचार करा! पवार कुटुंबाची परवानगी अनिवार्य; काय आहे नवा नियम?
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
'अजितदादा' यांच्या नावाने संस्था, ट्रस्ट किंवा फाऊंडेशनची नोंदणी करायची असल्यास आता त्यांच्या कुटुंबाची लेखी पूर्वपरवानगी घेणे राज्य सरकारने अनिवार्य केले आहे.
बारामती : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाचा, प्रतिमेचा किंवा त्यांच्या स्मृतीशी संबंधित कोणत्याही गोष्टीचा वापर आता कोणालाही परस्पर करता येणार नाही. 'अजितदादा' यांच्या नावाने संस्था, ट्रस्ट किंवा फाऊंडेशनची नोंदणी करायची असल्यास आता त्यांच्या कुटुंबाची लेखी पूर्वपरवानगी घेणे राज्य सरकारने अनिवार्य केले आहे. या संदर्भात उपमुख्यमंत्री कार्यालयाने धर्मादाय आयुक्तांना कडक निर्देश दिले आहेत.
नावाचा गैरवापर रोखण्यासाठी पाऊल
उपमुख्यमंत्री कार्यालयाचे विशेष कार्यकारी अधिकारी सुनीलकुमार मुसळे यांनी यासंदर्भात पत्र जारी केले आहे. अजितदादा पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या नावाने शैक्षणिक, सामाजिक संस्था किंवा चॅरिटेबल ट्रस्ट सुरू करण्यासाठी अनेकांकडून पुढाकार घेतला जात आहे. मात्र, अनेकदा या नावाचा वापर वैयक्तिक किंवा व्यावसायिक स्वार्थासाठी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा संभाव्य गैरवापर रोखण्यासाठी 'ना हरकत प्रमाणपत्र' (NOC) बंधनकारक करण्यात आले आहे.
advertisement
स्मारक आणि निधी संकलनावरही वॉच
केवळ संस्थाच नाही, तर सार्वजनिक ठिकाणी अजितदादांचे पुतळे उभारणे किंवा स्मारके निर्माण करतानाही शासन आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निकषांचे पालन करावे लागणार आहे. तसेच, त्यांच्या नावाचा वापर करून अनधिकृतपणे निधी गोळा करणाऱ्या संशयास्पद संस्थांची सखोल चौकशी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. ज्या जुन्या संस्थांना आपले नाव बदलून 'अजितदादा' यांचे नाव लावायचे आहे, त्यांनाही हाच नियम लागू असेल.
advertisement
या निर्णयामुळे आता अजितदादांच्या नावाने चालणाऱ्या उपक्रमांमध्ये पारदर्शकता येणार असून, त्यांच्या नावाचा गैरफायदा घेणाऱ्यांना चाप बसणार आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Mar 11, 2026 7:26 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Ajit Pawar: आता 'अजितदादा' नाव वापरण्यापूर्वी शंभर वेळा विचार करा! पवार कुटुंबाची परवानगी अनिवार्य; काय आहे नवा नियम?








