बुलाती है मगर जाने का नही, सौंदर्याची भुरळ पाडली, तरुणीने नाशिकच्या 'आशिक'ला अडकवलं जाळ्यात, 53 लाखांची लूट
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Nashik News: नाशिकमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मैत्री आणि प्रेमाचे आमिष दाखवून एका तरुणीने नाशिकच्या तरुणाला तब्बल ५३ लाख रुपयांना गंडा घातला आहे.
नाशिक: नाशिकमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मैत्री आणि प्रेमाचे आमिष दाखवून एका तरुणीने नाशिकच्या तरुणाला तब्बल ५३ लाख रुपयांना गंडा घातला आहे. एवढंच नव्हे तर तिने अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत, त्याला ब्लॅकमेलही केलं आहे. आपली फसवणूक होत असल्याचं लक्षात येताच तरुणाने पोलिसांत धाव घेत फिर्याद दाखल केली आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक येथे राहणाऱ्या एका तरुणाची फेसबुकच्या माध्यमातून सानवी खुराणा नावाच्या एका तरुणीशी ओळख झाली होती. या तरुणीने तरुणाला आपल्या सौंदर्याची भुरळ पाडली. गोड बोलून विश्वास जिंकला. सुरुवातीला मैत्री आणि नंतर प्रेमाचे नाटक करून तिने तरुणाचा विश्वास संपादन केला. यासाठी तिने वेगवेगळ्या व्हॉटस्अॅप क्रमांकांचा वापर करून तरुणाशी सतत संपर्क ठेवला होता.
advertisement
क्रिप्टो ट्रेडिंगचा बहाणा आणि लूट
जेव्हा तरुणाचा तरुणीवर पूर्ण विश्वास बसला, तेव्हा तिने त्याला क्रिप्टो करन्सी ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास अल्पावधीत मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवले. प्रेमात पडलेल्या तरुणाने तिच्या शब्दावर विश्वास ठेवून वेळोवेळी मोठी रक्कम ऑनलाईन पद्धतीने गुंतवली. ही सगळी रक्कम एका बनावट प्लॅटफॉर्मवर गुंतवली जात होती. यात भरघोस नफा दाखवला जात होता. मात्र ज्यावेळी हे पैसे काढायचे होते, तेव्हा विविध चार्जेस लावून तरुणाची तब्बल ५३ लाखांची लूट करण्यात आली.
advertisement
अश्लील व्हिडीओ आणि ब्लॅकमेलिंगचा धक्का
केवळ पैशांची फसवणूक करून ही तरुणी थांबली नाही, तर तिने या गुन्ह्यात 'हनी ट्रॅप'चा वापर केल्याचेही उघड झाले आहे. दोघांच्या संमतीने एकमेकांना पाठवलेले अश्लील फोटो आणि व्हिडीओचा वापर तिने शस्त्रासारखा केला. पैसे उकळल्यानंतर तिने हेच फोटो आणि व्हिडीओ पुन्हा तरुणाला व्हॉटस्अॅपवर पाठवून त्याला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली.
advertisement
इतकेच नव्हे तर, या तरुणीने तरुणाला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकीही दिली. आपली फसवणूक झाल्याचे आणि आपण एका मोठ्या जाळ्यात अडकल्याचे लक्षात येताच तरुणाने अखेर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी विविध कलमांतर्गत तरुणीवर गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलीस या प्रकरणातील 'सानवी खुराणा' नावाच्या तरुणीचा शोध घेत असून, यामागे एखादी मोठी टोळी सक्रिय असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
Mar 11, 2026 7:25 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
बुलाती है मगर जाने का नही, सौंदर्याची भुरळ पाडली, तरुणीने नाशिकच्या 'आशिक'ला अडकवलं जाळ्यात, 53 लाखांची लूट









