advertisement

Film Story : रात्री 1 ते 4 ची वेळ! हॉरर नाही तरी मध्यरात्रीच व्हायचं या फिल्मचं शूटिंग

Last Updated:
Film Story : एक जुनी भारतीय फिल्म ज्याचं शूटिंग रात्री 1 ते पहाटे 4 पर्यंत व्हायचं. शूटिंगसाठीसाठी मध्यरात्रीची वेळ निवडली यामागे एक खास कारण होतं.
1/7
फिल्मचं शूटिंग कसं होतं हे आता बहुतेकांना बऱ्यापैकी माहिती आहे. दिवसभरात तसं कधीही फिल्म शूट केली जाते. शक्यतो सीनची वेळ, सीनसाठी आवश्यक असलेलं वातावरण या सगळ्या गोष्टी पाहून फिल्मच्या शूटिंगची वेळ निवडली जाते.

2/7
आता हॉरर फिल्म शूट करायची म्हणजे रात्रीची वेळ, भयानक वातावरण हवं. तसं आता यासाठी तशी वेळ किंवा तशा वातावरणाची वाट पाहण्याची गरज नाही. तंत्रज्ञानाच्या मदतीने या गोष्टींची निर्मिती कृत्रिमरित्या तयार करता येते.

3/7
पण जर फिल्म हॉरर नसेल साधी असेल तर त्याचं शूटिंग तसं दिवसा व्हायला हवं हो की नाही. पण एक फिल्म जी हॉरर नाही पण तरी त्या फिल्मचं शूटिंग रात्रीच्या वेळेतच व्हायचं. या फिल्मचं शूटिंग रात्री 1 ते पहाटे 4 दरम्यान करण्यात आलं.

4/7
ही फिल्म 95 वर्षांपूर्वी 1931 साली मुंबईतील मॅजेस्टिक सिनेमागृहात प्रदर्शित झाली. असं म्हणतात की तेव्हा थिएटरबाहेर इतकी गर्दी झाली होती की परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिसांना बोलवावं लागलं होतं. एका ज्यू नाटकावर आधारित त्याची स्टोरी होती. फिल्ममध्ये दोन राण्यांमधील संघर्ष, राजवाड्यातील कारस्थान आणि प्रेमकथेचं चित्रण करण्यात आलं होतं.

5/7
याचं कारण म्हणजे या फिल्मचं शूटिंग मुंबईच्या जीटी रोड परिसरातील रेल्वे रुळाजवळील एका स्टुडिओमध्ये करण्यात आलं होतं. रेल्वे रूळ जवळ असल्याने दिवसा गाड्यांची सतत वर्दळ असायची आणि त्यांचे आवाजही रेकॉर्डिंगमध्ये यायचे.

6/7
तसंच दिवसाढवळ्या शूटिंगमध्ये प्रॉक्सी वापरतानाही अनेक अडचणी येत होत्या. त्यावेळी मायक्रोफोन इतके मोठे होते की ते कलाकारांच्या कपड्यांमध्ये किंवा सेट प्रॉप्समध्ये लपवावे लागत होते. संगीतकारांना अनेकदा झाडांच्या मागे लपून हार्मोनियम आणि तबला वाजवायला लागायचा. जेणेकरून त्यांचे आवाज कॅमेऱ्यात न दिसता रेकॉर्ड करता येतील.

7/7
हा चित्रपट एक ऐतिहासिक चित्रपट मानला जातो. याचं कारण म्हणजे  भारतातील हा पहिला बोलका चित्रपट.  ही फिल्म आहे आलम आरा. पारसी चित्रपट निर्माते अर्देशीर इराणी यांनी दिग्दर्शित केलेली ही फिल्म.  ज्याची कथा मुंबईत राहणारे बगदादी ज्यू नाटककार जोसेफ डेव्हिड यांच्या लोकप्रिय नाटक 'आलम आरा' वरून प्रेरित होती. असं म्हटलं जातं की इराणी यांनी हिंदी आणि उर्दू भाषा एकत्र करून आलम आरा सादर केला जेणेकरून चित्रपट अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल.

शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार, चालून आला गोल्डन चान्स
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार
  • गुंतवणूकदारांसाठी सर्वात मोठा जॅकपॉट

  • LIC आणि SBI कडून होणार शेअर्स विक्री

  • तुमचा वाटा मिळवण्यासाठी आतापासूनच प्लॅन करा

View All
advertisement