advertisement

Anda Tawa Fry : फक्त 15 मिनिटांत बनवा मसालेदार अंडा तवा फ्राय! होस्टेलर्ससाठी इन्स्टंट आणि हेल्दी रेसिपी

Last Updated:

Best easy recipe for hostelers : तुम्ही स्वयंपाकात नवीन असाल तर आजची ही रेसिपी खास तुमच्यासाठी. होस्टेलला सामान कमी असतं आणि वेळही कमी असतो, अशावेळी तुम्ही झटपट अंडा तवा फ्राय बनवू शकता. तुम्हला ही खायला आणि बनवायलाही मजा येईल.

अंडा तवा फ्राय बनवण्याची सोपी पद्धत..
अंडा तवा फ्राय बनवण्याची सोपी पद्धत..
मुंबई : जी मुलं-मुली होस्टेलला राहतात किंवा घरापासून दूर रूम करून राहतात. त्यांच्यातली बहुतांश मुलं बाहेरच जेवतात. काही मुलं रूमवर जेवण बनवतात. पण रोज बाहेर जेवणाऱ्यालाही कधीतरी घरचंच टेस्टी पण झटपट बनणारं काहीतरी खावंसं वाटू शकता. तुम्ही स्वयंपाकात नवीन असाल तर आजची ही रेसिपी खास तुमच्यासाठी.
होस्टेलला सामान कमी असतं आणि वेळही कमी असतो अशावेळी तुम्ही झटपट अंडा तवा फ्राय बनवू शकता. तुम्हला ही खायला आणि बनवायलाही मजा येईल. ही रेसिपी suman_kitchen_marathi या अकाऊंटवर शेअर केली गेली आहे. चला तर मग पाहूया कसं बनवायचं इन्स्टंट आणि हेल्दी अंडा तवा फ्राय.
अंडा तवा फ्राय बनवण्यासाठी लागणारं साहित्य..
- अंडी
advertisement
- कांदे
- टोमॅटो
- आलं लसूण पेस्ट
- जिरे
- कोथिंबीर
- लाल तिखट
- मटण मसाला
- घराचा कोणताही मसाला
- हळद
- मीठ
- तेल
अंडा तवा फ्राय बनवण्याची सोपी पद्धत..
- सर्वात आधी अंडी उकडून घ्या.
- आता एका पॅनमध्ये किंवा तव्यावर तेल टाका.
- तेल गरम झालं की त्यामध्ये आलं लसणाची पेस्ट, जिरे आणि चिरलेला कांदा टाकून परतून घ्या.
advertisement
- कांदा परतत आला की त्यामध्ये चिरलेला टोमॅटो टाका.
- हे परतलं की त्यामध्ये लाल तिखट, मटण मसाला, हळद आणि घराचा कोणताही मसाला टाकून परतून घ्या.
- मसाले परतल्यानंतर त्यामध्ये थोडं पाणी घाला आणि चवीनुसार मीठ टाका.
- हे व्यवस्थित शिजून गाळ झालं की त्यामध्ये कोथिंबीर टाका.
- यानंतर उकडलेले अंडे अर्धे करून यामध्ये टाका.
advertisement
- सर्वकाही छान परतून घ्या.
advertisement
तर इतक्या सोप्या पद्धतीने हा अंडा तवा मसाला बनून तयार होतो. तुम्ही होस्टेलवर तर हा बनवूच शकता. पण एकदा घरच्यांनाही बनवून खाऊ घाला. सर्वांना आवडेल ही डिश.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
Anda Tawa Fry : फक्त 15 मिनिटांत बनवा मसालेदार अंडा तवा फ्राय! होस्टेलर्ससाठी इन्स्टंट आणि हेल्दी रेसिपी
Next Article
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार, चालून आला गोल्डन चान्स
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार
  • गुंतवणूकदारांसाठी सर्वात मोठा जॅकपॉट

  • LIC आणि SBI कडून होणार शेअर्स विक्री

  • तुमचा वाटा मिळवण्यासाठी आतापासूनच प्लॅन करा

View All
advertisement