advertisement

महाराष्ट्र तापला! गरज असेल तरच बाहेर पडा; उष्णतेच्या लाटेनंतर पावसाचाही अलर्ट, हे शहर ठरलं हॉट सिटी'

Last Updated:
Weather alert: भारतीय शहरे ‘अर्बन हीट आयलंड’ बनत चालली असून ग्रामीण भागापेक्षा शहरांत तापमान अधिक जाणवत आहे, असा इशारा सीएसईच्या अहवाल आहे.
1/7
महाराष्ट्रात मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात उन्हाची तीव्रता कमालीची वाढली आहे. गुरुवारी राज्यातील 6 शहरांमध्ये तापमानाचा पारा चाळीशी पार राहिला. विदर्भ, उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत उष्णतेची लाट असून जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथे देशातील सर्वाधिक 42.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

2/7
यंदा मार्च महिन्यात सरासरीपेक्षा 2 त 4 अंश सेल्सिअस तापमान जास्त आहे. उत्तर महाराष्ट्रातील भुसावळ येथे पारा 42.5 अंशांवर गेला. तर उत्तर महाराष्ट्रातील नाशिकमध्ये 38.5 तर मालेगावमध्ये 39.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. छत्रपती संभाजीनगरचा पारा 39.8 अंशांवर होता.

3/7
मुंबईतील सांताक्रुझ परिसरात देखील गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत मार्चमध्ये सर्वाधिक तापमान नोंदवलं गेलं. या ठिकाणी 40 अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली. तर नंदुरबारला 42.4 अंशांपर्यंत तापमान नोंदवलं गेलंय.

4/7
महाराष्ट्रातील उत्तर महाराष्ट्रासह, मराठवाडा आणि विदर्भात 14 मार्चपर्यंत उष्णतेची लाट कायम राहील. त्यानंतर मात्र हवापालट होण्याचा अंदाज असून अवकाळी संकटाचा इशारा देण्यात आला आहे.

5/7
विदर्भात सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच 15 व 16 मार्च रोजी उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव, मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर, पुणे, सातारा आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, परभणी व बीडला पावसाची शक्यता आहे.

6/7
देशातील हवामानात देखील मार्चमध्ये मोठे बदल जाणवत आहेत. उत्तर भारतासह अनेक राज्यांत पारा 40 अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. गुजरात, सौराष्ट्र आणि कच्छ प्रदेशात उष्णतेच्या लाटेचा ‘ऑरेंज अलर्ट’ आहे. तर महाराष्ट्रातील विदर्भ, कर्नाक आणि केरळमध्ये देखील ‘यलो अलर्ट’ दिला आहे. अशातच हवामान विभागाने पुढील काही दिवसांत पारा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

7/7
सीएसईच्या अहवालानुसार, भारतीय शहरे ‘अर्बन हीट आयलंड’ बनत चालली आहेत. ग्रामीण भागापेक्षा शहरांत तापमान अधिक जाणवत आहे. तसेच रात्रीच्या तापमानात देखील वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांना आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. उन्हात बाहेर पडणं टाळावं लागेल.

शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार, चालून आला गोल्डन चान्स
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार
  • गुंतवणूकदारांसाठी सर्वात मोठा जॅकपॉट

  • LIC आणि SBI कडून होणार शेअर्स विक्री

  • तुमचा वाटा मिळवण्यासाठी आतापासूनच प्लॅन करा

View All
advertisement