ऑपरेशनसाठी आली नाही, रुम उघडताच काळजाचा ठोका चुकला, मुंबईतील बड्या रुग्णालयात महिला डॉक्टर आढळली मृत
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Woman Doctor Found Dead In Jagjivan Ram Hospital: मुंबई सेंट्रल येथील पश्चिम रेल्वेच्या जगजीवन राम रुग्णालयात एका महिला डॉक्टरचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळला आहे.
Woman Doctor Found Dead In Jagjivan Ram Hospital: मुंबई सेंट्रल येथील पश्चिम रेल्वेच्या जगजीवन राम रुग्णालयात एका महिला डॉक्टरचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळल्याने वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. डॉ. अनुजा कुलकर्णी असं मृत डॉक्टरचं नाव असून, त्या कान-नाक-घसा (ENT) तज्ज्ञ म्हणून कार्यरत होत्या.
नेमकी घटना काय?
डॉ. अनुजा कुलकर्णी या अविवाहित होत्या. रुग्णालयातील खोलीत त्यांचा मृतदेह आढळला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी त्यांच्या काही नियोजित शस्त्रक्रिया होत्या. मात्र, त्या ठरलेल्या वेळात ऑपरेशन थिएटरमध्ये पोहोचल्या नाहीत. त्यामुळे सहकाऱ्यांनी त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण त्याला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
त्यामुळे रुग्णालयातील कर्मचारी आणि डॉक्टरांनी त्यांच्या खोलीकडे धाव घेतली. तिथे पोहोचल्यावर डॉ. अनुजा या जमिनीवर निपचित पडलेल्या अवस्थेत आढळल्या. तातडीने तपासणी केली असता त्यांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं.
advertisement
पोलीस तपास सुरू
या घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी सध्या याप्रकरणी 'एडीआर' नोंदवला असून पुढील तपास सुरू केला आहे. मृत्यूचं नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोलिसांनी महिला डॉक्टरचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात पाठवला आहे.
A woman doctor posted at the Western Railway’s Jagjivan Ram Hospital in Mumbai Central was found dead under suspicious circumstances in her room. The deceased was identified as Dr. Anuja Kulkarni, an unmarried ENT specialist. When she failed to report for scheduled surgeries,… pic.twitter.com/81wz86lSCg
— IANS (@ians_india) March 13, 2026
advertisement
पोलिसांनी रुग्णालयातील आणि संबंधित इमारतीतील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत आहेत. डॉ. अनुजा यांचा मृत्यू नैसर्गिक आहे, की घातपात आहे, याचा तपास पोलीस करत आहे. एका बड्या रुग्णालयात महिला डॉक्टरचा अशाप्रकारे मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 13, 2026 9:41 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
ऑपरेशनसाठी आली नाही, रुम उघडताच काळजाचा ठोका चुकला, मुंबईतील बड्या रुग्णालयात महिला डॉक्टर आढळली मृत








