advertisement

Beed : संतोष देशमुख प्रकरणातील पहिला आरोपी 14 महिन्यानंतर जेलमधून बाहेर, कारण काय?

Last Updated:

Santosh Deshmukh case Jairam Chate released from jail : जयराम चाटेच्या धाकट्या भावाच्या निधनानंतर होणाऱ्या विधीस उपस्थित राहण्यासाठी न्यायालयाने त्याला पोलीस बंदोबस्तात जाण्याची परवानगी दिली आहे.

 Jairam Chate released from jail
Jairam Chate released from jail
Beed Santosh Deshmukh case : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडलं होतं. अशातच या प्रकरणात वाल्मिक कराडसह अनेकजण तुरूंगात आहेत. आता या प्रकरणातील आरोपी जयराम चाटे तब्बल 14 महिन्यांनंतर काही तासांसाठी बीड जिल्हा कारागृहातून बाहेर येणार आहे. न्यायालयाच्या परवानगीनंतर तब्बल 14 महिन्यांनंतर जयराम चाटे याला जेलमधून बाहेर येणार असल्याने पोलिसांनी मोठा बंदोबस्त देखील केला आहे.

पोलीस बंदोबस्तात जाण्याची परवानगी

जयराम चाटेच्या धाकट्या भावाच्या निधनानंतर होणाऱ्या विधीस उपस्थित राहण्यासाठी न्यायालयाने त्याला पोलीस बंदोबस्तात जाण्याची परवानगी दिली आहे. जयराम चाटेचा धाकटा भाऊ श्रीराम चाटे याचे 2 मार्च रोजी निधन झाले. बाराव्याच्या विधीस उपस्थित राहण्यासाठी जयराम चाटेच्या वकिलांनी न्यायालयात विशेष परवानगी मागितली होती. न्यायालयाने त्याला ती परवानगी दिली आहे.
advertisement

धार्मिक विधीसाठी सात तास जेलबाहेर

जयराम चाटेला दिवंगत भाऊ श्रीराम चाटेच्या बाराव्या दिवसाच्या धार्मिक विधीसाठी 13 मार्च रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत पोलिस बंदोबस्तात उपस्थित राहण्याची परवानगी न्यायालयाने दिली आहे. त्यानंतर त्याला पुन्हा तुरूंगात जावं लागेल. न्यायलयाने दोन्ही वकिलांच्या युक्तीवादानंतर हा निर्णय दिला होता.
advertisement

पोलिस बंदोबस्ताचा खर्च भरण्याची तयारी

कोर्टात आरोपीच्या वकिलांनी सर्व अटींचे पालन करण्याची तसेच पोलिस बंदोबस्ताचा खर्च भरण्याची तयारी दर्शवली होती. आरोपीवर गंभीर गुन्हे असल्याने त्याला बाहेर सोडल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा युक्तिवाद सरकारी पक्षाने केला होता. पण कोर्टाने दोन्ही बाजू ऐकल्यानंतर एक दिवसाची मर्यादित परवानगी जयराम चाटे याला दिली आहे. त्यानंतर आता तब्बल 14 महिन्यानंतर मोकळा श्वास घेतोय.
advertisement

धनंजय देशमुख यांची प्रतिक्रिया

दरम्यान, जयराम चाटे यांने तुरुंगातून बाहेर येण्यासाठी अर्ज केला होता. त्यावर सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली होती. "धार्मिक विधीच्या निमित्ताने आरोपी गावात येणार असल्याने तेथे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. अशा वेळी काही अनुचित प्रकार घडल्यास त्याची जबाबदारी नेमकी कोणाची?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. त्यामुळे आता पोलिसांनी तगडा बंदोबस्त लावलाय.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बीड/
Beed : संतोष देशमुख प्रकरणातील पहिला आरोपी 14 महिन्यानंतर जेलमधून बाहेर, कारण काय?
Next Article
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार, चालून आला गोल्डन चान्स
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार
  • गुंतवणूकदारांसाठी सर्वात मोठा जॅकपॉट

  • LIC आणि SBI कडून होणार शेअर्स विक्री

  • तुमचा वाटा मिळवण्यासाठी आतापासूनच प्लॅन करा

View All
advertisement