advertisement

गॅस संपला तर काळजी नको, आता सरकार देणार 'हा' पर्यायी इंधन; जुने दिवस पुन्हा परतणार?

Last Updated:
देशभरात सध्या गॅस सिलेंडर्सच्या पुरवठ्यात अडथळे येत असल्याच्या बातम्या येत आहेत. अशावेळी तुमची चूल बंद पडू नये म्हणून केंद्र सरकार आणि भारतीय तेल कंपन्यांनी एक सुरक्षित पाऊल उचलण्याची तयारी केली आहे.
1/7
एकेकाळी आपल्या स्वयंपाकघराचा अविभाज्य भाग असलेला तो 'निळा' रॉकेलचा डबा आठवतोय? घराच्या कोपऱ्यात ठेवलेला स्टोव्ह आणि त्याची ती विशिष्ट घरघर असा आवाज... गेल्या काही वर्षांत उज्ज्वला योजना आणि एलपीजी गॅसच्या क्रांतीमुळे आपण या आठवणी मागे सोडल्या होत्या. पण, नियतीचं चक्र बघा कसं फिरतंय, जगाच्या राजकारणातील तणावामुळे आज पुन्हा एकदा त्याच जुन्या दिवसांची चाहूल लागली आहे.

2/7
देशभरात सध्या गॅस सिलेंडर्सच्या पुरवठ्यात अडथळे येत असल्याच्या बातम्या येत आहेत. अशावेळी तुमची चूल बंद पडू नये म्हणून केंद्र सरकार आणि भारतीय तेल कंपन्यांनी एक सुरक्षित पाऊल उचलण्याची तयारी केली आहे.
देशभरात सध्या गॅस सिलेंडर्सच्या पुरवठ्यात अडथळे येत असल्याच्या बातम्या येत आहेत. अशावेळी तुमची चूल बंद पडू नये म्हणून केंद्र सरकार आणि भारतीय तेल कंपन्यांनी एक सुरक्षित पाऊल उचलण्याची तयारी केली आहे.
advertisement
3/7
गॅसची टंचाई का निर्माण होऊ शकते?इस्रायल-इराण युद्धामुळे आंतरराष्ट्रीय ऊर्जा पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. याचा थेट फटका भारताच्या एलपीजी साठ्याला बसण्याची शक्यता आहे. विशेषतः उत्तर प्रदेशसारख्या मोठ्या राज्यांमध्ये पुढील 10-12 दिवसांत गॅसची कमतरता जाणवू शकते. अशा परिस्थितीत लोकांचे हाल होऊ नयेत, म्हणून सरकारने रॉकेल हा जुना पण खात्रीशीर पर्याय निवडला आहे.

4/7
तेल कंपन्यांची रणनीती काय?पेट्रोल आणि डिझेलच्या शुद्धीकरण प्रक्रियेत रॉकेल हे नैसर्गिकरित्या तयार होतं. त्यामुळे रिफायनरीमध्ये रॉकेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. हे रॉकेल पुन्हा एकदा जुन्या पद्धतीने राशन दुकानांमधून (PDS) वितरित करण्याची योजना आहे.

5/7
तेल कंपन्यांनी जुन्या रॉकेल डीलर्सशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. विशेषतः पूर्व उत्तर प्रदेशातील वाराणसी आणि गोरखपूर सारख्या जिल्ह्यांमध्ये जुन्या साठवणूक टाक्या आणि वितरण मशिन्स सुस्थितीत आहेत का, याची तपासणी केली जात आहे.

6/7
गोरखपूर विभागातील आयओसीएल (IOCL) अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या केवळ सर्वेक्षण करून त्याचा रिपोर्ट केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाला पाठवण्याचे निर्देश दिले आहेत. हा केवळ एक अंतिम पर्याय आहे. पर्यावरणापूरक एलपीजी हेच सरकारचे मुख्य उद्दिष्ट आहे, पण युद्धामुळे निर्माण झालेल्या पेचप्रसंगात लोकांची गैरसोय होऊ नये, हा यामागचा शुद्ध हेतू आहे.

7/7
ग्राहकांनी घाबरून जाण्याची गरज नाही. सरकारची पहिली प्राथमिकता गॅस पुरवठा सुरळीत करणे हीच आहे. पण जर परिस्थिती हाताबाहेर गेली, तर तुमची चूल पेटती ठेवण्यासाठी रॉकेलचा हा पर्याय तयार ठेवला जात आहे. जागतिक संकट संपल्यावर कदाचित या 'बॅकअप प्लॅन'ची गरजही पडणार नाही, तोपर्यंत इंधनाचा वापर जबाबदारीने करणे हेच आपल्या हिताचे आहे.

शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार, चालून आला गोल्डन चान्स
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार
  • गुंतवणूकदारांसाठी सर्वात मोठा जॅकपॉट

  • LIC आणि SBI कडून होणार शेअर्स विक्री

  • तुमचा वाटा मिळवण्यासाठी आतापासूनच प्लॅन करा

View All
advertisement