advertisement

झकास भजी-पोहे, खाण्यासाठी होते मोठी गर्दी, 30 रुपयांत अमरावतीमध्ये इथं घ्या आस्वाद

Last Updated:
याठिकाणी मिळणारे भजी-पोहे खवय्यांच्या विशेष पसंतीस उतरले आहेत. अवघ्या 30 रुपयांत पोटभर नाश्ता मिळत असल्याने सकाळी 7 वाजल्यापासून पोहे खाण्यासाठी मोठी गर्दी पाहायला मिळते.
1/7
अमरावती जिल्ह्यातील वरूड तालुका संत्रा उत्पादनासाठी संपूर्ण राज्यात प्रसिद्ध आहे. येथील संत्र्यांची चव वेगळी असल्याचे नेहमी सांगितले जाते. मात्र, वरूडमध्ये केवळ संत्रेच नव्हे तर काही खाद्यपदार्थही त्यांच्या खास चवीमुळे ओळखले जातात.

2/7
त्यापैकी पांढुर्णा चौक परिसरातील त्रिमूर्ती हॉटेलजवळ असलेला श्री यशवंत साई पोहा पॉइंट हा खवय्यांचा आवडता ठिकाण बनला आहे. येथे मिळणारे पोहे चविष्ट असल्यामुळे सकाळी 7 वाजल्यापासूनच पोहे खाण्यासाठी ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळते.

3/7
श्री यशवंत साई पोहा पॉइंट हा दोन मित्रांच्या मेहनतीतून उभा राहिलेला व्यवसाय आहे. बंटी धरमठोक आणि कपिल कोचर या दोघांनी सुरुवातीला वेगवेगळे स्टॉल सुरू केले होते. मात्र, कोरोनाच्या काळात त्यांनी आपापले स्टॉल एकत्र करून नव्याने हा व्यवसाय सुरू केला.

4/7
त्यानंतर त्यांच्या स्टॉलवरील पोहे आणि भजे हळूहळू ग्राहकांच्या पसंतीस उतरले. या स्टॉलची खासियत म्हणजे पोह्यांसोबत दिली जाणारी बारीक भजी आणि तरीदार रस्सा. सर्वप्रथम प्लेटमध्ये गरमागरम भजी दिली जातात.

5/7
त्यावर पोहे घालून खास तयार केलेला रस्सा टाकला जातो. रस्यामध्ये टोमॅटो, बारीक चिरलेला कांदा, लिंबू आणि हिरवी मिरची घालून पोह्यांना वेगळी चव दिली जाते.

6/7
ही खास पोह्यांची प्लेट अवघ्या 30 रुपयांत ग्राहकांना दिली जाते. दररोज सुमारे 25 ते 30 किलो पोह्यांपासून जवळपास 300 प्लेट पोहे विकले जातात.

7/7
वरूड हे शहर मध्य प्रदेशच्या सीमेवर असल्यामुळे येथे प्रवाशांची सतत वर्दळ असते. त्यामुळे शहरात येणारे अनेकजण नाश्त्यासाठी या ठिकाणचे पोहे खाणे पसंत करतात. ग्राहकांना उत्तम दर्जाचे पोहे मिळावेत यासाठी बंटी धरमठोक आणि कपिल कोचर हे दोघेही मित्र सकाळी 6 वाजल्यापासून तयारीला सुरुवात करतात.

शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार, चालून आला गोल्डन चान्स
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार
  • गुंतवणूकदारांसाठी सर्वात मोठा जॅकपॉट

  • LIC आणि SBI कडून होणार शेअर्स विक्री

  • तुमचा वाटा मिळवण्यासाठी आतापासूनच प्लॅन करा

View All
advertisement