advertisement

Weather Alert : पुढील 24 तास महत्त्वाचे! महाराष्ट्राच्या हवेत येणार 'गारवा', 9 जिल्ह्यांना अलर्ट

Last Updated:
14 मार्च रोजी उष्णतेच्या लाटेसह राज्यातील 9 जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
1/7
महाराष्ट्रातील हवामानात मार्च महिन्यात मोठे बदल जाणवत आहेत. उष्णतेचा तडाखा जाणवत असताना आता अवकाळी पावसाचं संकट घोंघावत आहे. 14 मार्च रोजी उष्णतेच्या लाटेसह राज्यातील 9 जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

2/7
कोकण विभागातील मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघरमध्ये उष्ण आणि दमट हवामान राहील. मुंबईत कमाल तापमान 33-34 अंश सेल्सियस तर किमान तापमान 24-27 अंश राहील. मुंबई, ठाणे, रायगड, आणि पालघरला उष्णतेचा यलो अलर्ट असेल. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी.

3/7
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूरमध्ये कोरडे आणि उष्ण हवामान असेल. सातारा, सांगली आणि सोलापूरला वादळी वारा आणि विजांसह अवकाळी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुण्यात कमाल तापमान 34-37 अंश तर किमान तापमान 18-21 अंश राहील.

4/7
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार तापमान वाढ पाहायला मिळेल. नाशिकमध्ये कमाल तापमान 33-36 अंश तर किमान 20-22 अंश तापमान राहील.

5/7
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, नांदेड, परभणी आणि धाराशिवमध्ये उष्ण आणि कोरडे हवामान राहील. कमाल तापमान 34 ते 38 अंशांपर्यंत तर किमान तापमान 20-23 अंश राहील. बीड आणि धाराशिवमध्ये वादळी वाऱ्यांसह अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांना यलो अलर्ट हवामान खात्याने दिला आहे.

6/7
विदर्भातील नागपूर, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, बुलढाणामध्ये उष्णता कायम राहील. भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली वादळी वाऱ्यांसह अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांना यलो अलर्ट हवामान खात्याने दिला आहे. तर कमाल तापमान 35-39 अंश तर किमान तापमान 21-24 अंश तापमान राहील.

7/7
एकंदरीत, 14 मार्चला महाराष्ट्रात उष्णता कायम राहील तर काही ठिकाणी अवकाळी पाऊस पाहायला मिळेल. नागरिकांनी भरपूर द्रवपदार्थ घ्या, सूर्यप्रकाश टाळा आणि वादळी वाऱ्याची सावधगिरी बाळगा.

शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार, चालून आला गोल्डन चान्स
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार
  • गुंतवणूकदारांसाठी सर्वात मोठा जॅकपॉट

  • LIC आणि SBI कडून होणार शेअर्स विक्री

  • तुमचा वाटा मिळवण्यासाठी आतापासूनच प्लॅन करा

View All
advertisement