advertisement

इंडिगोचे दर वाढले, मध्यरात्रीनंतर विमान तिकीट बुक केल्यास मोजावे लागणार इतके पैसे; कंपनीचा मोठा निर्णय

Last Updated:

इंधनाच्या दरात झालेल्या या अभूतपूर्व वाढीमुळे इंडिगो कंपनीने हा अतिरिक्त भार ग्राहकांवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

इंडिगोने 31 डिसेंबरपर्यंत देशांतर्गत अनेक उड्डाणे केली रद्द, नेमकं कारण काय? कोणकोणती आहेत ठिकाणं...
इंडिगोने 31 डिसेंबरपर्यंत देशांतर्गत अनेक उड्डाणे केली रद्द, नेमकं कारण काय? कोणकोणती आहेत ठिकाणं...
नवी दिल्ली: मिडल ईस्टमध्ये सुरू असलेल्या भीषण भू-राजकीय संघर्षाची धग आता थेट प्रवाशांच्या खिशापर्यंत पोहोचली आहे. देशातील सर्वात मोठी विमान कंपनी असलेल्या 'इंडिगो'ने (IndiGo) आपल्या विमान तिकिटांच्या दरात वाढ करण्याची घोषणा केली आहे. 14 मार्च 2026 रोजी रात्री 12 वाजून 1 मिनिटापासून सर्व नवीन बुकिंगवर अतिरिक्त 'फ्यूल चार्ज' (इंधन शुल्क) लागू होणार आहे. यामुळे उन्हाळी सुट्ट्यांमध्ये प्रवासाचे नियोजन करणाऱ्या हजारो प्रवाशांचे बजेट कोलमडणार आहे.
'इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन'च्या (IATA) जेट फ्यूल मॉनिटरनुसार, मिडल ईस्टमधील तणावामुळे इंधनाच्या किमतीत तब्बल 85 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. विमान कंपन्यांच्या एकूण ऑपरेटिंग खर्चात 'एव्हिएशन टर्बाइन फ्यूल'चा (ATF) वाटा मोठा असतो. इंधनाच्या दरात झालेल्या या अभूतपूर्व वाढीमुळे कंपनीने हा अतिरिक्त भार ग्राहकांवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

नव्या दरांनुसार प्रति सेक्टर फ्यूल चार्ज असा असेल?

advertisement
  • भारतातील आणि इंडियन सबकॉन्टिनेंट रूटसाठी: 425 रुपये
  • मिडल ईस्टसाठी : 900 रुपये
  • साउथ ईस्ट एशिया-चीन आणि आफ्रिका-वेस्ट एशिया रूटसाठी : 1800 रुपये
  • युरोप रूटसाठी : 2300 रुपये

प्रवाशांमध्ये नाराजी

परिस्थितीनुसार या शुल्कात भविष्यात बदल केला जाऊ शकतो, असे कंपनीने स्पष्ट केले असले तरी अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे प्रवाशांमध्ये मोठी नाराजी आहे. विमान प्रवासाचे दर आधीच चढे असताना आता या नव्या इंधन शुल्कामुळे सर्वसामान्यांना विमान प्रवास परवडणारा उरला नाही, अशी भावना व्यक्त होत आहे. आगामी काळात इतर विमान कंपन्याही अशाच प्रकारची दरवाढ करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
view comments
मराठी बातम्या/देश/
इंडिगोचे दर वाढले, मध्यरात्रीनंतर विमान तिकीट बुक केल्यास मोजावे लागणार इतके पैसे; कंपनीचा मोठा निर्णय
Next Article
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार, चालून आला गोल्डन चान्स
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार
  • गुंतवणूकदारांसाठी सर्वात मोठा जॅकपॉट

  • LIC आणि SBI कडून होणार शेअर्स विक्री

  • तुमचा वाटा मिळवण्यासाठी आतापासूनच प्लॅन करा

View All
advertisement