advertisement

आईने मागितला डिवोर्स, वडिलांचं अभिनेत्रीसोबत अफेअर; थलापति विजयच्या मुलाने उचललं मोठं पाऊल, सगळेच शॉक

Last Updated:
टॉलिवूड सुपरस्टार थलापती विजय सध्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. विजय आणि त्याच्या पत्नीने लग्नाच्या 27 वर्षांनंतर घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. आई- वडिलांच्या घटस्फोटाच्या निर्णयामुळे थलापती विजयच्या लेकाने एक शॉकिंग निर्णय घेतला आहे. त्याच्या शॉकिंग निर्णयाची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. नेमका हा निर्णय काय आहे? जाणून घेऊया...
1/8
Thalapathy Vijay’s Son Jason Sanjay Makes Surprising Surname Change
टॉलिवूड सुपरस्टार थलापती विजयचा मुलगा जेसन संजय याने त्याच्या नावाबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अभिनेत्याच्या लेकाने घेतलेल्या निर्णयाने सर्वच शॉक झाले. जेसन संजयने त्याच्या नावातून वडील थलापती विजय यांचे नाव काढून टाकल्याची चर्चा सध्या सुरू आहे. खरं कारण काय? जाणून घेऊया...
advertisement
2/8
Thalapathy Vijay’s Son Jason Sanjay Makes Surprising Surname Change
जेसन संजयने त्याच्या नावाच्या पाठीमागे आईच्या नावाचा वापर करणं महत्त्वाचं समजलं आहे. तो आता "जेसन संजय एस" अशी आपली ओळख सांगतो. संगीता सोर्नालिंगम असं त्याच्या आईचं नाव आहे, आईच्या नावतील 'एस' या अक्षराचा तो वापर करतो. दक्षिण भारतात, माहेरचे नाव सहसा वापरले जाते, परंतु जेसनचे बदल बऱ्याच गोष्टी स्पष्ट करतोय.
advertisement
3/8
Thalapathy Vijay’s Son Jason Sanjay Makes Surprising Surname Change
विजय आणि त्याची पत्नी संगीता यांच्या घटस्फोटाच्या बातम्या चर्चेत असतानाच, जेसन संजयने त्याच्या नावात बदल केला आहे. दरम्यान, संगीताने 27 वर्षांच्या लग्नानंतर घटस्फोटासाठी अर्ज दाखल केल्याचे वृत्त आहे, ज्यामुळे चाहते खूप दु:खी झाले आहेत.
advertisement
4/8
Thalapathy Vijay’s Son Jason Sanjay Makes Surprising Surname Change
जेसनच्या या निर्णयामुळे तो त्याच्या आईला थेट पाठिंबा दर्शविल्याचे मानले जात आहे. कौटुंबिक कलह सुरू असताना, मुलाने त्याच्या आईचे नाव निवडल्याने हे स्पष्ट होते की तो या कठीण काळात तिच्यासोबत उभा आहे.
advertisement
5/8
Thalapathy Vijay’s Son Jason Sanjay Makes Surprising Surname Change
इन्स्टाग्रामवर जेसनने विजयला अनफॉलो केले आहे. तो केव्हाही त्याच्या वडिलांना इन्स्टाग्रामवर फॉलो करत नाही, परंतु सध्या त्यांच्यात सुरू असलेल्या वादामुळे जेसनने वडिलांना अनफॉलो केलं की काय? अशा सध्या चर्चा सुरू आहेत.
advertisement
6/8
Thalapathy Vijay’s Son Jason Sanjay Makes Surprising Surname Change
जेसन संजय लवकरच 'सिग्मा' चित्रपटातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहे. त्याच्या चित्रपटात सुंदर किशन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्याच्या व्यावसायिक आयुष्यातील ही नवीन सुरुवात, नाव बदलून, त्याच्या करियरची दिशा ठरवेल.
advertisement
7/8
Thalapathy Vijay’s Son Jason Sanjay Makes Surprising Surname Change
मीडिया रिपोर्ट्सनुसार, चेंगलपट्टू जिल्हा न्यायालयात संगीताने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. पण या प्रकरणाचा उलगडा फेब्रुवारी 2026 मध्ये झाला आहे. तेव्हापासून विजयच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
advertisement
8/8
Trisha Krishnan And Thalapathy Vijay
थलापती विजयचा चाहतावर्ग फार मोठ्या प्रमाणावर आहे. त्याच्या मुलाने घेतलेला हा निर्णय सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरला. विजयच्या राजकारणातील प्रवेशाचा आणि त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील वादांचा फॅमिलीवर इतका खोलवर परिणाम होत आहे का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
advertisement
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार, चालून आला गोल्डन चान्स
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार
  • गुंतवणूकदारांसाठी सर्वात मोठा जॅकपॉट

  • LIC आणि SBI कडून होणार शेअर्स विक्री

  • तुमचा वाटा मिळवण्यासाठी आतापासूनच प्लॅन करा

View All
advertisement