advertisement

Extra Marital : विवाहबाह्य संबंधात पार्टनरशी गप्पा मारण्यासाठी लोक कोणती वेळ निवडतात? समोर आला सिक्रेट Time

Last Updated:

ग्लिडनच्या अहवालानुसार, भारतातील युजर्स सरासरी दिवसाला एक ते दीड तास या अ‍ॅपवर घालवतात. पण चॅटिंगसाठी दोन विशेष टाइम स्लॉट्समध्ये युजर्सची संख्या प्रचंड वाढलेली असते.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
मुंबई : आपण सर्वजण दिवसाची सुरुवात व्हॉट्सॲप आणि फेसबुकने करतो, पण भारतातील लाखो लोकांच्या स्मार्टफोनमध्ये असे काही अ‍ॅप्स आहेत जे केवळ ठराविक वेळेतच 'गजबजलेले' असतात. ज्या देशात लग्न ही एक पवित्र संस्था मानली जाते, तिथेच आता 'एक्स्ट्रा-मॅरिटल डेटिंग'चा (विवाहबाह्य संबंध) कल वेगाने वाढतोय.
'ग्लिडन' (Gleeden) या विवाहबाह्य डेटिंग अ‍ॅपच्या ताज्या आकडेवारीनुसार, भारतात तब्बल 40 लाखांहून अधिक युजर्स झाले आहेत. पण सर्वात रंजक बाब म्हणजे, हे लोक पूर्ण दिवस ऑनलाइन नसतात. तर त्यांच्या गप्पांच्या 'दोन खास वेळा' आहेत. या वेळा कोणत्या आणि लोक याच वेळेची निवड का करतात? जाणून घेऊया सविस्तर.
ग्लिडनच्या अहवालानुसार, भारतातील युजर्स सरासरी दिवसाला एक ते दीड तास या अ‍ॅपवर घालवतात. पण चॅटिंगसाठी दोन विशेष टाइम स्लॉट्समध्ये युजर्सची संख्या प्रचंड वाढलेली असते.
advertisement
दुपारी 12 ते 3 (ऑफिस ब्रेक आणि घरची निवांत वेळ)
ही वेळ अनेक कारणांमुळे खास आहे. ऑफिसमध्ये काम करणाऱ्यांसाठी हा लंच ब्रेकचा काळ असतो, जिथे कामाच्या गडबडीतही गुपित चॅटिंगसाठी वेळ मिळतो. तर घरून काम करणाऱ्या किंवा गृहिणींसाठी ही घरची कामं आटोपल्यानंतरची निवांत वेळ असते. या काळात आजूबाजूला कोणीही नसतं, त्यामुळे गोपनीयता राखणं सोपं जातं.
advertisement
रात्री 10 ते मध्यरात्र (प्रायव्हसीची 'पीक' टाइम)
दिवसभराची धावपळ थांबल्यानंतर आणि घरचे सर्व सदस्य झोपल्यानंतर रात्री 10 ते 12 या वेळेत सर्वाधिक युजर्स ऑनलाइन असतात. वैयक्तिक प्रायव्हसी आणि शांतता यामुळे रात्रीचा हा वेळ अशा प्लॅटफॉर्मसाठी 'हॉटस्पॉट' ठरत आहे.
कोण आहेत हे लोक आणि त्यांना काय हवंय?
आकडेवारी केवळ वेळेपुरती मर्यादित नाही, तर युजर्सच्या आवडीनिवडीबद्दलही बरेच काही सांगते.
advertisement
अ‍ॅपवर महिलांच्या संख्येत गेल्या 2 वर्षांत 148% वाढ झाली आहे. महिला युजर्स प्रामुख्याने 30 ते 40 वयोगटातील, आर्थिकदृष्ट्या स्थिर असलेल्या डॉक्टर्स, सीए आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना चॅटिंगसाठी प्राधान्य देतात.
पुरुष युजर्स साधारणपणे 25 ते 30 वयोगटातील महिलांशी संवाद साधण्यास अधिक उत्सुक असतात.
शहरे कोणती आघाडीवर?
जर तुम्हाला वाटत असेल की तुमचं शहर यात मागे आहे, तर ही लिस्ट पाहा. बंगळुरू (18%) आणि हैदराबाद (17%) या आयटी हबमध्ये सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह युजर्स आहेत. त्यापाठोपाठ दिल्ली (11%), मुंबई (9%) आणि पुणे (7%) यांचा क्रमांक लागतो.
advertisement
डिजिटल युगात नात्यांचे स्वरूप बदलत आहे. गोपनीयतेची सोय आणि स्मार्टफोनचा वाढता वापर यामुळे लोक आपल्या रोजच्या आयुष्यापलीकडे जाऊन नवे संवाद शोधत आहेत. वेळेची ही गणितं केवळ आकडेवारी नसून ती बदलत्या मानवी स्वभावाचा आणि गरजेचा आरसा आहेत.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Extra Marital : विवाहबाह्य संबंधात पार्टनरशी गप्पा मारण्यासाठी लोक कोणती वेळ निवडतात? समोर आला सिक्रेट Time
Next Article
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार, चालून आला गोल्डन चान्स
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार
  • गुंतवणूकदारांसाठी सर्वात मोठा जॅकपॉट

  • LIC आणि SBI कडून होणार शेअर्स विक्री

  • तुमचा वाटा मिळवण्यासाठी आतापासूनच प्लॅन करा

View All
advertisement