advertisement

Pune: आदिवासी मुलांच्या शासकीय वस्तीगृहात 20 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची शक्यता, पिंपरीत खळबळ

Last Updated:

वस्तीगृहातील दूषित पाणी प्यायल्यामुळे 20 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना  उलटी , मळमळ झाल्याने उपचारासाठी दाखल केलं आहे.

News18
News18
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.  आदिवासी मुलांचे शासकीय वस्तीगृहातील  विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.  वस्तीगृहातील दूषित पाणी प्यायल्यामुळे 20 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना  उलटी , मळमळ झाल्याने उपचारासाठी दाखल केलं आहे. यातील १० विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवडमधील आदिवासी मुलांच्या शासकीय रुग्णालयामध्ये ही घटना घडली आहे. आदिवासी मुलांच्या शासकीय वस्तीगृहात  पाणी प्यायल्यामुळे २० मुलांना अचानक उलटी आणि मळमळीचा त्रास होऊ लागला. त्यामुळे मुलांना तातडीने  नवीन भोसरी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. १० मुलांवर अजूनही उपचार सुरू आहे.
आदिवासी वसतीगृहात हा प्रकार घडल्यामुळे एकच खळबळ उडाली.  विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी असा हलगर्जीपणा करणे अत्यंत निंदनीय आणि गंभीर बाब आहे. या बद्दल  प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई  यांनी या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून संबंधित गृहपाल राजकुमार राक यांच्यावर कठोर कारवाई करावी आणि त्यांची या वस्तीगृहातून कायमची हकालपट्टी करावी, अशी मागणी आदिवासी संघटनेनं केली आहे.  तसंच,  संबंधितांवर तात्काळ कारवाई झाली नाही, तर वस्तीगृहात तीव्र निषेध आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आदिवासी संघटनेनं दिला.
advertisement
(सविस्तर बातमी लवकरच)
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune: आदिवासी मुलांच्या शासकीय वस्तीगृहात 20 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची शक्यता, पिंपरीत खळबळ
Next Article
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार, चालून आला गोल्डन चान्स
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार
  • गुंतवणूकदारांसाठी सर्वात मोठा जॅकपॉट

  • LIC आणि SBI कडून होणार शेअर्स विक्री

  • तुमचा वाटा मिळवण्यासाठी आतापासूनच प्लॅन करा

View All
advertisement