advertisement

MHADA Lottery 2026: खुशखबर! मुंबईमध्ये म्हाडाची 2500 घरांच्या लॉटरीची तारीख ठरली, कधी निघणार सोडत?

Last Updated:

म्हाडा मुंबई मंडळाकडून 2500 घरांसाठी एप्रिल 2026 मध्ये लॉटरी काढली जाणार आहे. म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर अधिकृत जाहिरात प्रसिद्ध होईल.

News18
News18
मुंबई:
मुंबई शहरामध्ये प्रत्येक व्यक्तीचं घर घेण्याचं स्वप्न असतं. पण सध्या मुंबईमध्ये गगनला भिडलेल्या घरांच्या किंमतीमुळे सध्याच्या घडीला सामान्य मुंबईकराला घर घेणं अशक्य आहे. आता सामान्य नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाची बातमी आहे. म्हाडा मुंबई मंडळाकडून 2500 घरांसाठी एप्रिल 2026 मध्ये लॉटरी काढली जाणार आहे. येत्या काही दिवसांमध्ये म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर अधिकृत जाहिरात प्रसिद्ध होईल. मागाठाणे, विक्रोळी आणि प्रतीक्षा नगर यांसारख्या भागांतील घरांचा यात समावेश असेल. कमी दरामध्ये घर मिळवण्याची संधी मुंबईकरांना आता मिळणार आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईमध्ये घरांच्या किंमती गगनाला भिडलेल्या असताना सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या दरात म्हाडाकडून घरे उपलब्ध करून दिले जाणार आहेत. या लॉटरीसाठीची प्रशासकीय तयारी अंतिम टप्प्यात आहे. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लॉटरीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. तर एप्रिलमध्ये या घरांची सोडत काढली जाणार आहे. या दरम्यान, इच्छुकांना अर्ज भरण्यासाठी सुमारे एक महिन्याचा कालावधी दिला जाणार आहे. अर्जांच्या छाननीनंतर एप्रिल महिन्याच्या अखेरीस घरांची संगणकीय सोडत जाहीर केली जाण्याची शक्यता आहे.
advertisement
म्हाडा मुंबई मंडळाकडून मागाठाणे, प्रतीक्षा नगर आणि विक्रोळीसह अशा मुंबईतील विविध भागात घरांचा समावेश असणार आहे. यामुळे शहरातील परवडणाऱ्या घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या हजारो लोकांना घर घेण्याची संधी मिळू शकते. मुंबई आणि उपनगरामध्ये प्रायव्हेट बिल्डरकडे घरांच्या किंमती फार मोठ्या प्रमाणावर असतात. त्या किंमतीमध्ये मुंबई सारख्या शहरामध्ये घर घेणं परवडत नाही. म्हाडाचे घरं सामान्य नागरिकांना लॉटरीच्या पद्धतीने मिळतात. म्हाडाची घरे सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी आहेत. त्यामुळे या लॉटरीकडे मुंबईकरांचे मोठ्या प्रमाणावर लक्ष लागून राहिले आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
MHADA Lottery 2026: खुशखबर! मुंबईमध्ये म्हाडाची 2500 घरांच्या लॉटरीची तारीख ठरली, कधी निघणार सोडत?
Next Article
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार, चालून आला गोल्डन चान्स
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार
  • गुंतवणूकदारांसाठी सर्वात मोठा जॅकपॉट

  • LIC आणि SBI कडून होणार शेअर्स विक्री

  • तुमचा वाटा मिळवण्यासाठी आतापासूनच प्लॅन करा

View All
advertisement