advertisement

थलापति विजयच्या आयुष्यात मोठा भूकंप, आधी बायकोने केले गंभीर आरोप, आता पोटच्या पोराने उचललं मोठं पाऊल

Last Updated:
Thalapathy Vijay Son: गेल्या काही दिवसांपासून साऊथ सुपरस्टार थलापती विजयच्या घटस्फोटाच्या बातम्यांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. अशातच विजयचा मुलगा जेसनने एक मोठा निर्णय घेत आपल्या आईला खुला पाठिंबा दर्शवला आहे.
1/9
गेल्या काही दिवसांपासून साऊथ सुपरस्टार थलापती विजयच्या घटस्फोटाच्या बातम्यांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. विजयची पत्नी संगीताने अभिनेत्यावर विवाहबाह्य संबंधांचे धक्कादायक आरोप केले असून यामुळे त्याच्या राजकीय करिअरवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

2/9
मात्र, अशातच विजयला आता आणखी मोठा धक्का बसला आहे. काही दिवसांपूर्वीच विजयचा मुलगा जेसन याने त्याला सोशल मीडियावरून अनफॉलो केलं होतं. या बातमीने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. परंतु आता जेसनने एक मोठा निर्णय घेत आपल्या आईला खुला पाठिंबा दर्शवला आहे.

3/9
जेसनने चक्क वडिलांचं म्हणजेच विजयचं नाव झटकून आईची बाजू सावरली आहे. थलापतीचा मुलगा जेसन संजय याने आपल्या नावातून वडिलांची ओळख पुसून टाकल्याने दक्षिणेत एकाच खळबळ उडाली आहे.

4/9
जेसन संजय लवकरच दिग्दर्शक म्हणून सिनेसृष्टीत पदार्पण करतोय. मात्र, आपल्या या प्रोफेशनल करिअरची सुरुवात करण्यापूर्वीच त्याने एक मोठा 'बॉम्ब' टाकला आहे. जेसनने आपल्या नावापुढील वडिलांचं नाव काढून तिथे आईच्या नावाचं आद्याक्षर जोडलं आहे.

5/9
आता तो स्वतःची ओळख 'जेसन संजय एस' (Jason Sanjay S) अशी करून देत आहे. या नावातील 'एस' म्हणजे त्याची आई संगीता सोर्नालिंगम. दक्षिण भारतात वडिलांच्या नावाचं इनिशियल लावण्याची परंपरा असताना जेसनने केलेला हा बदल बरंच काही सांगून जात आहे.

6/9
विजयसोबत २७ वर्षांचा संसार केल्यानंतर संगीताने विजयसोबत घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आणि साऊथ सिनेसृष्टीत जणू भूकंपच आला. आदर्श जोडपं म्हणून ओळख असणाऱ्या विजय आणि संगीताला या परिस्थितीत पाहताना चाहत्यांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या आहेत.

7/9
घटस्फोटाच्या अर्जात संगीताने विजयवर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचे आरोप केले आहेत. अशातच जेसन संजयने उघडपणे आईच्या नावाला पसंती देऊन आपण कोणाच्या बाजूने आहोत, हे स्पष्ट केलं आहे.

8/9
जेसनने आपल्या वडिलांना इंस्टाग्रामवर अनफॉलो केलं आहे. काहींचं म्हणणं आहे की त्याने कधीच त्यांना फॉलो केलं नव्हतं, तरीही घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान हे असं घडणं आगीत तेल ओतण्यासारखं ठरलं आहे.

9/9
एकीकडे घरात कलह सुरू असताना जेसन आपल्या 'सिग्मा' (Sigma) या पहिल्या चित्रपटाच्या तयारीत व्यग्र आहे. या चित्रपटात सुंदर किशन मुख्य भूमिकेत आहे. नावातील या बदलामुळे चित्रपटाच्या क्रेडिट रोलमध्ये आता थलापती विजयचं नाव दिसणार नाही.

शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार, चालून आला गोल्डन चान्स
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार
  • गुंतवणूकदारांसाठी सर्वात मोठा जॅकपॉट

  • LIC आणि SBI कडून होणार शेअर्स विक्री

  • तुमचा वाटा मिळवण्यासाठी आतापासूनच प्लॅन करा

View All
advertisement