advertisement

PAK vs BAN : पाकिस्तानी खेळाडूच्या मदतीला धावला भारतीय दिग्गज, रनआऊटवर प्रचंड चिडला, बांग्लादेशला झाप झाप झापलं

Last Updated:

पाकिस्तानच्या सलमान आगाला वादग्रस्तरित्या रनआऊट करण्यात आलं होतं. त्यावरून मोठा वाद पेटला होता. या वादावर भारताचा दिग्गज खेळाडू प्रचंड चिडला असून त्याने बांगलादेशला झाप झाप झापलं आहे.

Salman Agha Runout Controversy
Salman Agha Runout Controversy
Salman Agha Runout Controversy : ढाकाच्या शेरे बंगला स्टेडिअमवर पार पडलेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात पाकिस्तानने डिएलएस मेथडनूसार 128 धावांनी सामना जिंकला आहे. या सामन्यात पाकिस्तानने 274 धावांचे लक्ष्य ठेवले होते.पण पावसामुळे बांग्लादेशसमोर 243 धावाचे लक्ष्य होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना बांग्लादेश 114 धावांवर ऑलआऊट झाली होती.त्यामुळे पाकिस्तानने हा सामना डिएलएस मेथडनूसार 128 धावांनी जिंकला आहे. या सामन्यात पाकिस्तानच्या सलमान आगाला वादग्रस्तरित्या रनआऊट करण्यात आलं होतं. त्यावरून मोठा वाद पेटला होता. या वादावर भारताचा दिग्गज खेळाडू प्रचंड चिडला असून त्याने बांगलादेशला झाप झाप झापलं आहे.
खरं तर ही घटना 38 व्या ओव्हरला घडली होती. बांग्लादेशकडून ही ओव्हर टाकायला मेहंदी हसनला आला होता.त्याच्या या ओव्हरच्या चौथ्या बॉलवर मोहम्मद रिझवानने फक्त बॉल प्लेस केला होता. आणि हा बॉल सलमान आघाच्या ज्या नॉनस्ट्राईक एंडवर उभा होता.त्या ठिकाणी गेला होता. सलमानकडे हा बॉल हळू येत होता. तर मेहंदी हसन हा बॉल पकडण्याचा प्रयत्नात होता.
advertisement
या दरम्यान बॉल सलमान आगाच्या बाजूला थांबताच त्याने तो उचलून मेहंदी हसनच्या हातात देण्याचा प्रयत्न केला. पण इतक्यात मेहंदी हसनने बॉल हातात घेऊन त्याला रनआऊट केले. खरं तर बॉल सलमानकडे थांबल्यामुळे तो मेहंदी हसनला उचलून देणार होता. पण त्याआधीच मेहंदी हसनने त्याला रनआऊट केले.खरं तर खेळभावना जपत सलमान ही कृती करत होता. पण मेहंदी हसनने अशाप्रकारे त्याला आऊट केले.
advertisement
advertisement
दरम्यान मेहदी हसनने अपील करताच अंपायनरे हा निर्णय़ थर्ड अंपायरकडे सोपवला.त्यानंतर थर्ड अंपायरने सलमानला रनआऊट दिले होते.त्यामुळे या निर्णयानंतर सलमान आघा प्रचंड संतापला होता आणि त्याने हेल्मेट काढून मैदानात आपटलं होतं, त्यानंतर त्याने ग्लोव्हज काढून देखील फेकले होते.या दरम्यान सलमान आघा प्रचंड चिडला होता.त्यामुळे मैदानात मोठा ड्रामा झाला होता.
advertisement
भारताचा दिग्गज खेळाडू काय म्हणाला?
सलमान आगाच्या या वादग्रस्त रनआऊटवर आता टीम इंडियाचा दिग्गज क्रिकेटपटू मोहम्मद कैफने प्रतिक्रिया दिली आहे.यावेळी कैफ बांगलादेशवर प्रचंड चिडलेला. हे असं व्हायला पाहिजे नव्हतं.विकेट मिळवण्याची कोणतीही हताश भावना या धावबादला समर्थन देऊ शकत नाही. तेही एका कर्णधाराकडून,अशा शब्दात कैफने आपला राग व्यक्त केला.
तरुणांनो, कृपया लक्षात ठेवा, जरी वर्ल्ड कप फायनल तोंडावर असली तरी बांगलादेशच्या कर्णधाराने जे केले ते कधीही करू नका. निष्पक्ष खेळाशिवाय खेळ हा खेळ नाही,अशा शब्दात कैफने बांग्लादेशला झापलं होत.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
PAK vs BAN : पाकिस्तानी खेळाडूच्या मदतीला धावला भारतीय दिग्गज, रनआऊटवर प्रचंड चिडला, बांग्लादेशला झाप झाप झापलं
Next Article
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार, चालून आला गोल्डन चान्स
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार
  • गुंतवणूकदारांसाठी सर्वात मोठा जॅकपॉट

  • LIC आणि SBI कडून होणार शेअर्स विक्री

  • तुमचा वाटा मिळवण्यासाठी आतापासूनच प्लॅन करा

View All
advertisement