PAK vs BAN सामन्यादरम्यान मोठी दुर्घटना, पाकिस्तानी खेळाडूला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेलं, नेमकं काय घडलं?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
सामन्या दरम्यान एक मोठी दुर्घटना घडली आहे. पाकिस्तानी खेळाडू फिल्डींग करत असताना त्याला दुखापत झाली होती.त्यामुळे त्याला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेण्यात आले होत.
Pakistan vs Bangladesh : ढाकाच्या शेरे बंगला स्टेडिअमवर पार पडलेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात पाकिस्तानने डिएलएस मेथडनूसार 128 धावांनी सामना जिंकला आहे. या सामन्यात पाकिस्तानने 274 धावांचे लक्ष्य ठेवले होते.पण पावसामुळे बांग्लादेशसमोर 243 धावाचे लक्ष्य होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना बांग्लादेश 114 धावांवर ऑलआऊट झाली होती.त्यामुळे पाकिस्तानने हा सामना डिएलएस मेथडनूसार 128 धावांनी जिंकला आहे. दरम्यान या सामन्या दरम्यान एक मोठी दुर्घटना घडली आहे. पाकिस्तानी खेळाडू फिल्डींग करत असताना त्याला दुखापत झाली होती.त्यामुळे त्याला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेण्यात आले होत.त्यामुळे खेळाडूला नेमकं काय झालं आहे? हे जाणून घेऊयात.
पाकिस्तानी ऑलराऊंडर हुसैन तलत आज फिल्डींग करत असताना त्यांच्या खांद्याला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेण्यात आलं होतं.त्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं होतं.
बांगलादेशच्या डावाच्या सहाव्या ओव्हर दरम्यान ही घटना घडली होती. लिंटन दासने मोहम्मद वसीमचा बॉल ऑफ साईडला मारला होता. दरम्यान हा बॉल पकडण्यासाठी तलत कवर बाऊन्ड्रीच्या दिशेने पळाला. दरम्यान बॉल बाऊन्ड्रीला स्पर्श करण्यापूर्वी तलतने बॉल ओढण्याचा प्रयत्न केला. बॉलला स्पर्श करताच त्याचा पाय फोमवर पडला. त्यानंतर तो जाहिरातीच्या फलकावर आदळला आणि त्याच्या डाव्या खांद्याला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर लोक तलतच्या बाजूला धावले. त्यानंतर त्याला जवळच्या रुग्णवाहिकेत नेण्यासाठी स्ट्रेचर आणण्यात आले.
advertisement
दरम्यान तलक बाहेर गेल्याच्या एक ओव्हरनंतर पावसामुळे सामना थांबवण्यात आला.त्यानंतक अनेक तास पाऊसच थांबला नाही.त्यानंतर डिएलएस नियमानुसार बांग्लादेशसमोर 243 धावांचे लक्ष्य होते. यावेळी या लक्ष्याचा पाठलाग करताना बांग्लादेश 114 धावांवर ऑल आऊट झाली होती. त्यामुळे पाकिस्तानने हा सामना डिएलएस मेथडनूसार 128 धावांनी जिंकला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 13, 2026 11:35 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
PAK vs BAN सामन्यादरम्यान मोठी दुर्घटना, पाकिस्तानी खेळाडूला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेलं, नेमकं काय घडलं?










