advertisement

'गरम भजी घेऊन ये, भूक लागलीये', पतीला हॉटेलमध्ये पाठवलं, बस स्टँडवरूनच पत्नी पळाली!

Last Updated:

लग्नाला फक्त तीन महिने झालेले असतानाच पत्नी तिच्या पतीला बस स्टँडवरच सोडून पळाली आहे. पत्नीने बस स्टँडवरच्या स्टॉलवर नवऱ्याला भजी आणायला पाठवलं.

'गरम भजी घेऊन ये, भूक लागलीये', पतीला हॉटेलमध्ये पाठवलं, बस स्टँडवरूनच पत्नी पळाली!
'गरम भजी घेऊन ये, भूक लागलीये', पतीला हॉटेलमध्ये पाठवलं, बस स्टँडवरूनच पत्नी पळाली!
लग्नाला फक्त तीन महिने झालेले असतानाच पत्नी तिच्या पतीला बस स्टँडवरच सोडून पळाली आहे. पत्नीने बस स्टँडवरच्या स्टॉलवर नवऱ्याला भजी आणायला पाठवलं. नवरा जसा भजी आणायला गेला ते पाहून पत्नी तिथून पळून गेली. पीतम सिंग याचं लग्न 1 डिसेंबर 2025 ला रिमझिम नावाच्या 18 वर्षांच्या मुलीसोबत झालं. होळीनिमित्त रिमझिम तिच्या माहेरी गेली होती. सण संपल्यानंतर 9 मार्चला पीतम त्याच्या पत्नीला आणण्यासाठी सासरी पोहोचला आणि दोघंही निघाले.
घरी परत येत असताना पीतम आणि रिमझिम बिलारी बस स्टँडवर उतरले आणि पुढच्या बसची वाट पाहायला लागले. तेव्हाच रिमझिमने मला भूक लागली आहे, भजी घेऊन ये, असं पीतमला सांगितलं. यानंतर पीतम समोरच्या दुकानातून गरम भजी आणायला गेला.
पीतम भजी घेऊन आला पण त्याला रिमझिम स्टँडवर दिसलीच नाही. बराच वेळ पितमने शोधलं पण त्याला रिमझिम कुठेच दिसली नाही. पितमने पत्नीबाबत आजूबाजूच्या लोकांनाही विचारलं, अखेर तो बिलारी पोलीस स्टेशनला पोहोचला आणि पत्नी हरवल्याची तक्रार दिली.
advertisement
पत्नी तिच्या माहेरच्या एका युवकासोबत गेल्याचं पीतमने पोलिसांना सांगितलं आहे. पोलीस सध्या याप्रकरणाचा तपास करत असून बस स्टँडवरचे सीसीटीव्ही तपासले जात आहेत. तसंच रिमझिमचं मोबाईल लोकेशनही शोधलं जात आहे, पण नवऱ्याला भजी आणायला पाठवून पळालेल्या पत्नीची घटना आसपासच्या परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे.
view comments
मराठी बातम्या/देश/
'गरम भजी घेऊन ये, भूक लागलीये', पतीला हॉटेलमध्ये पाठवलं, बस स्टँडवरूनच पत्नी पळाली!
Next Article
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार, चालून आला गोल्डन चान्स
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार
  • गुंतवणूकदारांसाठी सर्वात मोठा जॅकपॉट

  • LIC आणि SBI कडून होणार शेअर्स विक्री

  • तुमचा वाटा मिळवण्यासाठी आतापासूनच प्लॅन करा

View All
advertisement